शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जॉर्ज फ्लॉईडनंतर अजून एका कृष्णवर्णियावर पोलिसांचा गोळीबार; अमेरिकेत पुन्हा उसळला हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 5:54 PM

1 / 8
कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर अमेरिकेत वर्णभेदावरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस अधिकच धुमसत आहे. दरम्यान, जॉर्ज फ्लॉईडनंतर आजा अजून एका कृष्णवर्णियाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. त्यामुळे वर्णभेदाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा अधिकच भडका उडाला आहे.
2 / 8
आंदोलकांनी शनिवारी अटलांटामधील एक मुख्य महामार्ग बंद केला. तसेच जिथे संबंधित कृष्णवर्णीय व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला त्या रेस्टॉरंटला आग लावली. ही कृष्णवर्णीय व्यक्ती केवळ अटकेपासून वाचण्याचा प्रयत्न करत होती, असा दावा आंदोलकांनी केला आहे.
3 / 8
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओसमोर आल्यानंतर कृष्णवर्णियांवर होणाऱ्या भेदभावाबाबत सुरू असलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला अधिकच बळकटी आली आहे. तसेच अटलांटांमध्ये हिंसाचारासही सुरुवात झाली आहे.
4 / 8
याबाबत महापौर किशा लान्स बॉटम्स यांनी सांगितले की, वेंडी येथील २७ वर्षीय रेशर्ड ब्रुक्सच्या शुक्रवारी झालेल्या मृत्युप्रकरणी पोलीस प्रमुख एरिका शिल्डस यांचां राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.
5 / 8
पोलिसांचे पथक आग शमवण्यासाठी पोहोचेपर्यंत आंदोलकांनी रेस्टॉरंट जाळले होते. तसेच महामार्गावर मोर्चा काढत वाहतूक रोखली, अशी माहिती विविध वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.
6 / 8
गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या संबंधित व्यक्तीवर बलप्रयोग करण्याची गरज होती, असे वाटत नाही, असे स्थानिक महापौर बॉटम्स यांनी सांगितले. दरम्यान, अटलांटामधील अधिकाऱ्यांनी संबंधित कृष्णवर्णियावर गोळ्या झाडणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचे नाव जाहीर केलेले नाही. हे दोघे अधिकारी श्वेतवर्णीय होते.
7 / 8
पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेला ब्रुक्स हा एका लहान मुलीचा पिता होता. तो शनिवारी आपला वाढदिवस साजरा करत होता. दरम्यान ही घटना जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर झाल्याने आंदोलनाचा भडका अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.
8 / 8
अटलांटामध्ये जिथे हा गोळीबार झाला तिथे गोळीबाराच्या विरोधात आंदोलन झाले. त्यावेळी १०० हून अधिक लोकांनी अधिकाऱ्यांना फोन करून संबंधित घटनेप्रकरणी आरोप केले.
टॅग्स :United StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय