शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Imran Khan News: पाकिस्तानचं सरकार कोसळणार? पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का, मित्रपक्ष दगा देण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:06 PM

1 / 8
पाकिस्तानमध्ये (Pakistan) विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणाऱ्या इम्रान खान सरकारला (Imran Khan Government) मोठा झटका बसला आहे. सध्या पाकिस्तानातील इम्रान खान सरकार कोसळेल की काय अशी शक्यताही निर्माण झाली आहे.
2 / 8
'सत्ताधारी आघाडीतील पीटीआयचे सर्व मित्रपक्ष १०० टक्के विरोधकांकडे झुकलेले आहेत. ते पुन्हा आपल्या बाजूने आणण्याची जबाबदारी इम्रान खान यांची आहे,' असं वक्तव्य इम्रान सरकारमधील मित्रपक्ष पीएमएलक्यूचे नेते आणि पंजाब विधानसभेचे अध्यक्ष परवेझ इलाही यांनी केलंय.
3 / 8
'समर्थनाचं आश्वासन देण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याची वेळ संपत आली आहे. हे आधी केलं असतं, तर ते टाळताही आलं असतं,' असं परवेझ इलाही म्हणाले.
4 / 8
इलाही यांचा पक्ष पीएमएलक्यू केंद्रात आणि पंजाब विधानसभेत इम्रान खान यांच्या पक्षाचा मित्रपक्ष आहे. जमियत, पीएमएल-एन आणि पीपीपी या तीन पक्षांची विरोधी आघाडी दीर्घकाळ टिकणारी आणि स्थिर असल्याचंही त्यांनी म्हटलं.
5 / 8
पाकिस्तान अविश्वास प्रस्तावावर मतदानाला काही दिवस उरले असतानाच हे इलाही यांचं वक्तव्य समोर आलं आहे. आतापर्यंत इम्रान खान यांना पाठिंबा देणाऱ्या बीएपी, एमक्यूएम-पी आणि पीएमएल-क्यू या पक्षांनी या अविश्वास प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
6 / 8
विरोधी पक्षनेत्यांच्या ऐवजी जनता आपल्या पाठीशी उभी असल्याचा दावा यापूर्वी इम्रान खान यांनी केला होता. तसंच इम्रान खान यांनी अविश्वास ठरावापूर्वी २७ फेब्रुवारीला इस्लामाबादमध्ये मोठी मिरवणूकही काढली होती.
7 / 8
शक्तीप्रदर्शन करून विरोधी पक्षांवर दबाव टाकण्याचं काम इम्रान खान करतील असं म्हटलं जात आहे. सध्या त्यांच्या मित्रपक्षांच्या बैठकींना वेग आला असून त्यांच्या निर्णय काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
8 / 8
या राजकीय संकटात महत्त्वाची बाब म्हणजे बीएपी, एमक्यूएम-पी आमि पीएमएल-क्यू या पक्षांकडे नॅशनल असेंबलीमध्ये १७ खासदार आहेत. जर हे विरोधीपक्षांकडे गेले, तर इम्रान खान सरकारच्या खासदारांची संख्या १७९ वरून १६२ पर्यंत पोहोचेल.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान