Politicians' homes set afire, shoot-at-sight orders as protests against govt intensify
Sri Lanka Protest: अश्रु, उपाशी पोट, जाळपोळ अन् गोळ्या घालण्याचे आदेश; पाहा श्रीलंकेतील वेदनादायी फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 4:51 PM1 / 8वाढती महागाई, बेरोजगारी, आर्थिक संकटाच्या परिणामी श्रीलंकेत नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मागील ३० वर्षातील सर्वात भीषण आर्थिक संकटाला श्रीलंकेतील जनता सामोरी जात आहे. 2 / 8कधीकाळी तामिळींचा द्वेष आणि राष्ट्रवादाच्या मुद्यावर राजपक्षे सरकारचे कौतुक करणाऱ्या जनतेकडून सरकारविरोधात आंदोलन करत आहे. काही ठिकाणी हिंसाचाराचा आगडोंबही उसळला आहे. 3 / 8श्रीलंकेमध्ये उसळलेल्या दंगतील आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. देशात आणीबाणी लागू झाली आहे. महागाई उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. स्वातंत्र्य झाल्यापासून श्रीलंकेवर पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे. 4 / 8श्रीलंकन रुपयाची किंमत सातत्याने कोसळत आहे. मार्चमध्ये एक डॉलरची किंमत २०१ श्रीलंकन रुपये होत होती. ती आता ३६० श्रीलंकन रुपयांपर्यंत वाढली आहे. श्रीलंकेत महागाईचा दर हा १७ टक्क्यांचा आकडा पार करून पुढे पोहोचला आहे. दूध, तांदूळ आणि तेलासारख्या जीवनाश्यक वस्तूंसाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. 5 / 8पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याने देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. येथील बहुतांश इंधन पंपांवर पेट्रोल आणि डिझेल नसल्याचे सांगण्यात येत आहे.6 / 8लोकांना त्यांच्या गरजांसाठीही युद्ध लढावे लागत आहे. या फोटोत तुम्ही घरगुती सिलेंडरसाठी लागलेली रांग पाहू शकतात. लहान मुलांपासून, महिला आणि वृद्ध देखील या रांगेत उभे आहेत. तसेच अनेक जणांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.7 / 8श्रीलंकेत आतापर्यंत १२हून अधिक मंत्र्यांची घरं जाळण्यात आली आहेत. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिली आहे. मात्र यानंतरही महिंदा राजपक्षे यांना अटक करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे.8 / 8श्रीलंकेत परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली असून या देशाचा यादवीकडे प्रवास सुरू आहे. श्रीलंकेमध्ये होत असलेला हिंसाचार पाहता संरक्षण मंत्रालयाने लष्कराला गोळीबाराचा आदेश दिला आहे. जे नागरिक सरकारी मालमत्तेचं नुकसान करत असतील किंवा जे नागरिक हिंसाचारामध्ये भाग घेत असतील त्यांना थेट गोळ्या घाला असा आदेश श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराला दिला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications