शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पॉपॉय बनण्यासाठी केलेला 'भलताच' प्रयोग अंगाशी; तरुणाचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 3:38 PM

1 / 10
नव्वदीच्या दशकात अनेक उत्तमोत्तम कार्टून्स छोट्यांच्या भेटीला आली. या कार्टून्स बच्चे कंपनीचं मनोरंजन केलं. त्यातलंच एक कार्टून म्हणजे पॉपॉय-द सेलर मॅन.
2 / 10
सामर्थ्यवान आणि चतुर पॉपॉय अनेक लहानग्यांचा आवडता. पालक खाऊन पॉपॉय शत्रूशी दोन हात करायचा. पॉपॉयचे फुगलेले दंड, बेटकुळ्या पाहून बच्चे कंपनीला मजा यायची.
3 / 10
रशियातल्या किरिल्ल टेरेशिनलादेखील पॉपॉय आवडायचा. आपणदेखील पॉपॉयसारखं दिसावं यासाठी किरिल्लनं एक प्रयोग केला. आता हा प्रयोग त्याच्या चांगलाच अंगाशी आला आहे.
4 / 10
किरिल्ल टेरेशिनचे दंड अगदी पॉपॉयसारखे आहेत. त्यामुळे अनेक जण त्याच्यासोबत फोटो काढतात. पॉपॉयसारख्या बेटकुळ्या हीच किरिल्लची ओळख आहे. मात्र आता हीच ओळख त्याच्यासाठी जीवघेणी ठरण्याची शक्यता आहे.
5 / 10
दंड पॉपॉयसारखे दिसावेत यासाठी किरिल्लनं त्यात इंजेक्शनच्या मदतीनं पेट्रोलियम जेली घातली. त्यानंतर किरिल्लचे दंड सुजत गेले. त्याची परिस्थिती बिघडत गेली.
6 / 10
सध्याच्या घडीला किरिल्ल उपचार घेत आहे. किरिल्लची प्रकृती पाहता त्याला दंड गमवावे लागू शकतात. परिस्थिती बिघडल्यास त्याला जीवदेखील गमवावा लागू शकतो.
7 / 10
पेट्रोलियम जेलीच्या मदतीनं दंड फुगवल्यानंतर किरिल्ल त्याच्या परिसरात ओळखला जाऊ झाला. २०१९ मध्ये त्यानं त्याच्या दंडात ३ लीटर पेट्रोलियम जेली इंजेक्ट केली.
8 / 10
यानंतर किरिल्लचे दंड फुगले. पॉपॉयसारखे दंड असल्यानं किरिल्ल लोकल सेलिब्रिटी झाला. अनेक जण त्याच्यासोबत फोटो काढायचे. मात्र हळूहळू किरिल्लची प्रकृती खालावू लागली.
9 / 10
किरिल्ल सध्या २४ वर्षांचा आहे. त्याचे बायसेप्स २४ इंचाचे आहेत. सध्या त्याची स्थिती गंबीर आहे. यातून बाहेर पडण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल.
10 / 10
दंडामध्ये पेट्रोलियम जेली इंजेक्ट आयुष्यातील मोठी चूक होती, असं किरिल्लनं म्हटलं. आपल्या एका चुकीचं परिणाम आता भोगावे लागत असल्याची व्यथा त्यानं मांडली.