मॅक्सिकोत शक्तिशाली भूकंप, 200 हून अधिक ठार By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 10:44 PM
1 / 8 मॅक्सिको देशाची राजधानी मॅक्सिको सिटी बुधवारी शक्तिशाली भूकंपानं हादरली. 2 / 8 या भूकंपात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. 3 / 8 भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पूएब्ला प्रांतामध्ये होता. 4 / 8 या भूकंपाच्या दुर्घटनेनंतर मॅक्सिकोमधील लोक रस्त्यावर उतरून सैरावैरा पळत होते. 5 / 8 मॅक्सिकोचे राष्ट्रपती पेना निएटो यांनीही भूकंपाच्या दुर्घटनेत मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. 6 / 8 या भूकंपात जवळपास 27 इमारती कोसळल्याही माहितीही राष्ट्रपती पेना निएटो यांनी दिली आहे. 7 / 8 भूकंपानंतर मॅक्सिको सिटी विमानतळावरून विमानांचं उड्डाण रोखण्यात आलं. दोन आठवड्यांपूर्वीच मॅक्सिकोच्या दक्षिणेकडच्या भागात झालेल्या भूकंपात 90 लोकांचा मृत्यू झाला होता. 8 / 8 मॅक्सिकोमध्ये 1985 सालानंतर आलेला सर्वात विध्वंसकारी भूकंप आहे. आणखी वाचा