Birth Pods : मुलांना जन्म देण्यासाठी आता गर्भधारणेची गरज नाही, तंत्रज्ञानाद्वारे अशी जन्माला येणार मुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 15:46 IST
1 / 7विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज नवनवे संशोधन होत असते. दरम्यान, आता एक असं संशोधन समोर आलं आहे ज्यामुळे मुलांना जन्म देण्यासाठी आता महिलांना गर्भधारणेची आवश्यकता राहणार नाही. तसेच प्रसुतीवेळी होणाऱ्या वेदनाही सहन कराव्या लागणार नाहीत. या क्रांतिकारी संशोधनाचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. 2 / 7एवढंच नाही तर जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये आपल्याला हव्या तसा सवयी, आवडीनिवडी यांचा अंतर्भावही करता येणार आहे. तुम्हाला कशा प्रकारचं मूल हवं आहे, तसा बदल करता येणार आहे. 3 / 7या संशोधनामुळे तुम्ही तुमच्या मुलाला विकसित होताना पाहू शकाल. हे जगातील पहिलं कृत्रिम भ्रूण केंद्र आहे. ज्यामध्ये मुल हे बर्थ पॉडमध्ये विकसित केलं जाईल. सायन्स कम्युनिकेटर आणि व्हिडिओ प्रोड्युसर हाशेम अल घैनी यांनी हा दावा केला आहे. 4 / 7हाशेम यांनी सांगितले की, भविष्यात मुले पुश बटण तंत्रज्ञानाद्वारे जन्माला येतील. गर्भधारणा होईल, पण कुठल्याही महिलेच्या शरीरात नाही तर बर्थ पॉड्समध्ये. तिथे तुम्ही बाळाला विकसित होताना पाहू शकाल. दर आठवड्याला, महिन्याला होणारी वाढ तुम्हाला दिसेल. 5 / 7या सुविधेचं नामकरण हे एक्टोलाइफ असं करण्यात आलं आहे. येथे एक कॉम्प्युटर मॅट्रिक्स बनवण्यात येईल. त्यामद्ये मानवी वर्तनाची संपूर्ण माहिती असेल. तुम्हाला कशा प्रकारचं मूल हवं आहे. तसं मूल जन्माला घातलं जाईल. म्हणजेच क्रिकेटपटू बाळ जन्माला घालायचं असेल तर जेनेटिक्समध्ये तसे बदल करून मूल जन्माला घातलं जाईल. 6 / 7आपल्या नरजेसमोर मुलाचा वाढ होताना पाहण्यासाठी तुम्ही हे बर्थ पॉड्स तुमच्या घरामध्येही लावू शकाल. या भ्रूण केंद्रामध्ये ४०० बेबी पॉड्स असतील. सर्वच्या सर्व रिन्युएबल एनर्जीवर चालतील. तुम्ही तुमच्या बाळाचे आवश्यक वाइटल्सना अॅपच्या माध्यमातून मॉनिटर करू शकाल. तसेच त्यामध्ये सुधारणाही करता येतील. 7 / 7हाशेम अल घैली यांचे हे दावे, व्हिडीओ, फोटोंनंतर या कॉन्सेप्टवरून वादाला सुरुवात झाली आहे. अॅक्टोलाइफला पहिले कृत्रिम भ्रूण केंद्र म्हणून पाहिजे जात आहे. मात्र त्यामुळे गर्भधारणेच्या नैतिक संकल्पनेला नुकसान पोहोचणार आहे. तसेच अशा प्रकारे बर्थ पॉड्समधून मुलांना जन्माला घालणे मानवताविरोधी कृत्य ठरणार आहे.