शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पत्रकारांनी विचारलेल्या 'त्या' प्रश्नावर डोनल्ड ट्रम्प संतापले; पत्रकार परिषद सोडून निघाले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 2:49 PM

1 / 7
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान वाढले आहे. जगभरातून अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 29 हजारवर पोहोचली आहे. तर आतापर्यत 80 हजार 562 लोकांचा मृत्यू झाला आहे.
2 / 7
अमेरिकेचे राष्ट्रपती भवन व्हाइट हाऊस सध्या कोरोना व्हायरसच्या जाळ्यात सापडलं आहे. याठिकाणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पैंस यांच्या नजीकच्या काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे व्हाइट हाऊसमध्ये कामाला जाण्यास भीती वाटत आहे असं राष्ट्राध्यक्षाच्या सहकाऱ्याने सांगितले आहे.
3 / 7
अमेरिकेत दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषद घेऊन विविध माहिती देत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आज देखील व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र या परिषदेत पत्रकाराच्या प्रश्नावर संतापून डोनाल्ड ट्रम्प यांनी परिषद अर्ध्यावर सोडून निघून गेल्याचे दिसून आले.
4 / 7
व्हाइट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत आशियाई महिला पत्रकार जियांग यांनी ट्रम्प यांना लसीच्या चाचणीबाबत प्रश्न विचारला. अमेरिकेत ८० हजारांहून अधिकजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतरही लस चाचणीला आपण जागतिक स्पर्धा म्हणून पाह आहात का असा सवाल जियांग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला.
5 / 7
जियांग यांच्या या प्रश्नानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हाच प्रश्न तुम्ही चीनला विचारा असं उत्तर दिलं. यानंतर जियांग यांनी मला तुम्ही विशेष उल्लेखून असं उत्तर देत आहात, का असा प्रतिप्रश्न केला. या प्रश्नानंतर डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापलेले दिसून आले.
6 / 7
जियांग यांच्या प्रतिप्रश्नाला मी सगळ्यांना सर्व प्रश्नाचे उत्तर दिले आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. तसेच मला जे वाईट प्रश्न विचारतात त्यांनाही माझे हेच उत्तर असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सरळ पत्रकार परिषदेतूनच निघून जाण्याचा निर्णय घेतला.
7 / 7
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ट्रम्प सरकारविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वातावरण आहे. लॉकडाउनविरोधातही अनेक राज्यातही आंदोलने झाली होती.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प