Protection against Covid-19 comes via an injection. But Could Corona vaccine be taken as a pill?
Corona Vaccine: इंजेक्शनऐवजी आता टॅबलेटद्वारे लस मिळण्याची शक्यता; कोरोना लढाईत ठरणार मोठी गेम चेंजर? By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 2:03 PM1 / 10कोरोना व्हायरस संक्रमणापासून वाचण्यासाठी लोकांना इंजेक्शन देऊन लसीकरण केले जात आहे. परंतु भविष्यात टॅबलेट आणि इनहेलरच्या माध्यमातून लस मिळू शकते. बीबीसी रिपोर्टनुसार, स्वीडन येथील सर्वात मोठ्या सायन्स पार्कनं इन्जेमो एंडरसनच्या नेतृत्वात यावर काम सुरू केले आहे. ते प्लास्टिकचा असा स्लिम इनहेलर बनवत आहेत ज्याची साईज काडेपेटीच्या निम्मी आहे.2 / 10एंडरसन आणि त्यांच्या टीमला अपेक्षा आहे की, हा छोटा इनहेलर कोरोनाच्या लढाईत संपूर्ण जगासाठी मजबूत शस्त्राचं काम करणार आहे. इनहेलरच्या माध्यमातून लोक लसीची पावडर स्वत:च्या घरी घेऊन जाऊ शकतात. फर्मचे सीईओ जोहन वोबोर्ग यांनी सांगितले की, ही खूप स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारं तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर दमाचे रुग्ण करतात. 3 / 10ते म्हणाले की, तुम्ही केवळ यावर चिटकवलेली छोटीसी स्लिम हटवून इनहेलर वापरू शकता. त्यानंतर ते तोंडात पकडून श्वास घ्या. ही इनहेलर लस नाकापासून फुस्फुस्सापर्यंत तिचा परिणाम दाखवेल.4 / 10Iconovo नावाच्या कंपनीने स्टॉकहोममध्ये एक इम्यूनोलॉजी रिसर्च स्टार्टअप ISRसोबत केला आहे. ज्यात कोविड १९ विरुद्ध ड्राई पावडर लस विकसित केली आहे. ही कोविड १९ व्हायरस प्रोटीन्ससाठी याचा वापर होतो. (फायझर, मॉडर्ना, एस्ट्राजेनेकासारख्या लसी RNA अथवा DNA मध्ये वापरतात जे या प्रोटीन्सचे कोड आहेत)5 / 10ही लस ४० डिग्री तापमानातही ठेऊ शकतो. WHO द्वारे परवानगी मिळालेली सर्व लिक्विड फॉर्म लस स्टोअर करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या लसी फ्रिजपर्यंत पोहचवण्यासाठी मजबूत जारमध्ये -७० डिग्री से. तापमान ठेवावं लागतं. असं न केल्यास लसीचा प्रभाव कमी होतो. 6 / 10ISR चे संस्थापक आणि कोरोलिंक इंस्टिट्यूटमध्ये इम्यूनोलॉजीचे प्रा. ओला विंकिस्ट सांगतात की, कोल्ड चेनविना ही लस सहजपणे वाटपासाठी मोठी गेम चेंजर ठरू शकते. इतकचं नाही तर हेल्थकेयर प्रोवाइडर्सच्या मदतीशिवाय लोकांना ही लस घेता येऊ शकते. ही लस कुठल्याही टॅबलेटसारखी असू शकते. 7 / 10कंपनीने सांगितले की, सध्या ही लस कोविड १९ च्या बीटा व्हेरिएंट आणि अल्फा व्हेरिएंटवर टेस्ट करण्यात आली आहे. आमचं हे पाऊल आफ्रिकन देशांमध्ये लसीकरणात प्रगती आणण्यासाठी योग्य आहे. याठिकाणी इतर कुठलीही कंपनी लस उत्पादन करत नाही. उच्च तापमान आणि खराब वीज पुरवठामुळे लस ठेवण्यासाठी मोठं आव्हानात्मक आहे. 8 / 10Iconovo पासून जवळपास १० मिनिटांच्या अंतरावर आणखी एक नवा अविष्कार तयार होत आहे. कॅरोलिंस्कामध्ये ग्लोबल ट्रान्सफॉर्मेशन फॉर हेल्थचे प्रोफेसर आणि २०१६ ते २०२० पर्यंत यूनिसेफचे ग्लोबल हेल्थ चीफ असलेले स्वार्टिलिंग पीटरसन यांनी प्रॉमिसिंग टेक्नोलॉजीसह एक नवीन करार केला आहे. 9 / 10स्वीडनची फार्मस्यूटिकल कंपनी Ziccum एक असं फ्यूचर लिक्विड लस तयार करत आहे ज्याच्या प्रभावाची कोणती मर्यादा नाही. त्यामुळे विकसित देशात फिल एँन्ड फिनिश सुविधा देणे सहज सोप्पे होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे विकसित देश त्यांच्या देशातच लसीचा अंतिम टप्पा पूर्ण करू शकतात. 10 / 10Ziccum चे सीईओ गोरन कोनराड्सन म्हणाले की, ही लसीची पावडर पाणीत मिसळून पुन्हा इंजेक्शनद्वारे लोकांना दिली जाऊ शकते. ही लस नसल स्प्रे अथवा टॅबलेटच्या माध्यमातूनही लोकांना दिली जाऊ शकते. परंतु या तंत्रज्ञानावर अद्याप काम करण्याची गरज आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications