शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Putin Russia Ukraine Invasion: पुतीनना कीव्ह कधीच नको होते! दाखवले एक, साध्य केले दुसरेच; ब्रम्हा चेलानींनी दिला भारतालाही इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 4:36 PM

1 / 8
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्या त्याला आता ४० दिवस होत आले आहेत. पहिल्याच दिवशी रशियन फौजा राजधानी कीव्हच्या जवळ जाऊन पोहोचल्या होत्या. तो ६४ किमी लांबीचा ताफा देखील अगदी जवळ होता. तरी देखील रशियाने कीव्हवर म्हणाव्या तेवढ्या शक्तीने आणि वेगाने आक्रमण केले नाही. अवघे जग, युद्ध तज्ज्ञ देखील बुचकळ्यात पडले होते.
2 / 8
६४ किमी लांबीचा ताफा पुतीन यांनी युक्रेनची राजधानी कीव्हच्या सीमेवरच का थांबवला. याचे कोडे आता कुठे सुटू लागले आहे. पुतीन यांनी जगाला दाखविले एक आणि साध्य केले त्यांना हवे होते ते, असा दावा युद्ध तज्ज्ञांनी आता केला आहे.
3 / 8
संरक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध विशेषज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी फ्रान्सने जारी केलेल्या युक्रेनवर रशियाने मिळविलेल्या ताब्याच्या नकाशावरुन मोठा दावा केला आहे. रशिया आपल्या लक्ष्याच्या खूप जवळ पोहोचला आहे. पुतीन यांना नाटो आणि रशियामध्ये बफर झोन हवा होता, तो त्यांनी आतापर्यंत ताब्यात घेतल्याचे चेलानी म्हणाले.
4 / 8
छोट्या छोट्या देशांमध्ये मोठ्या शक्तींचा हस्तक्षेप खूपच विनाशकारी असतो. १९९१ मध्ये अमेरिकेने ४१ दिवस इराकमध्ये हल्ले केले. तेव्हा त्यांनी तेथील सैन्य आणि नागरी सेवा सुविधा उद्ध्वस्त केल्या. यानंतर अमेरिकेने जमिनीवरून हल्ले सुरु केले.
5 / 8
यानंतर नाटोच्या २०११ मधील घातक युद्धामुळे लिबियादेखील एक अपयशी देश बनला आहे, असे त्यांनी ट्विट केले. परंतू पुतीन हे युक्रेनमधील आपल्या लक्ष्याच्या दिशेने पुढे जात असल्याचे ते म्हणाले.
6 / 8
क्रिमियापर्यंत लँड कॉरिडॉर तयार करण्यात रशियाला यश आल्याचे चेलानी म्हणाले. रशियाने अझोव्हचा किनारा ताब्यात घेतला आहे. एवढेच नाही तर रशियाने काळ्या समुद्राचा बहुतांश भाग ताब्यात घेतला आहे. नाटोच्या विरोधात एक धोरणात्मक बफर झोन तयार करणे, हे पुतीन यांचे ध्येय असल्याचे यावरून दिसते असे ते म्हणाले. पुतीन आता कोणत्याही परिस्थितीत ही ताब्यात आलेली जमीन रिकामी करणार नाही.
7 / 8
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे चीनचा उदय होण्यासाठी सतत मदत करत आहेत. रशियावर कठोर निर्बंध लादून रशियाला चीनचा भागीदार बनविण्याचा प्रयत्न दिसत आहे. बायडन यांच्याच उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने तसे म्हटले आहे. निर्बंधांमुळे रशियाला चीनकडे जाण्यास भाग पडेल. यामुळे सामरिक भागीदार म्हणून भारत रशियावर अवलंबून राहू शकत नाही, असेही अमेरिकेने म्हटले आहे.
8 / 8
त्याचाच भाग हा अमेरिकेचे भारताच्या दौऱ्यावर आलेले उप एनएसए दलीप सिंह यांचे वक्तव्य होते. असे करून अमेरिका भारताला धोक्यात घालण्यासोबतच आपल्य़ाही पायावर धोंडा मारून घेत असल्याचे चेलानी म्हणाले.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन