Queen Elizabeth II funeral in royal pomp; The clock gave 96 beats per minute
शाही अंत्यसंस्कार; बिग बेन घड्याळाने मिनिटाला दिले 60 ऐवजी 96 टोले By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 1:24 PM1 / 11ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (वय ९६) यांच्या पार्थिवावर लंडन येथे शाही इतमामात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगभरातील मान्यवर उपस्थित होते. 2 / 11अंत्यसंस्कारांचे प्रक्षेपण जगभरातील लोकांनी पाहिले. सेंट जॉर्ज चॅपेलच्या दफनभूमीत राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे जिथे अंत्यसंस्कार झाले त्याच्याशेजारी राणीच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले.3 / 11ब्रिटनमधील सर्व नागरिकांनी सोमवारी राणी एलिझाबेथ यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून सोमवारी श्रद्धांजली वाहिली. सत्तर वर्षे ब्रिटनवर राज्य केलेल्या राणी एलिझाबेथ यांच्या अनेक आठवणी ब्रिटनवासीयांच्या मनात तरळल्या. नागरिकांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर ब्रिटनचे राष्ट्रगीत वाजविण्यात आले.4 / 11सात दशके ब्रिटनवर राज्य केलेल्या राणी एलिझाबेथ यांच्या कारकीर्दीत जागतिक स्तरावर अनेक घडामोडी घडल्या. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विस्टन चर्चिल ते सध्याच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्यापर्यंत अनेकांची कारकीर्द राणी एलिझाबेथ यांनी पाहिली होती. त्यांनी राज्यकर्त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले होते. 5 / 11या साऱ्या स्मृतींना ब्रिटनमधील व जागतिक स्तरावरील वृत्तवाहिन्यांवरून सोमवारी उजाळा देण्यात येत होता. सोशल मीडियावरही असंख्य नेटकऱ्यांनी राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहणारे संदेश लिहिले होते. राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर सोमवारी लंडनमध्ये अंत्यसंस्कार झाले.6 / 11‘त्या’ दोन मुलांकडे सर्वांचे लक्ष राणी एलिझाबेथ यांच्या अंत्ययात्रेमध्ये राजघराण्यातील सर्व सदस्य सहभागी झाले होते. राजे चार्ल्स तृतीय, त्यांच्या पत्नी कॅमिला, चार्ल्स यांचे दोन पुत्र विलियम व हॅरी तसेच त्यांच्या पत्नी, विलियम यांची मुले आदी सदस्य सामील झाले होते. त्यामध्ये सर्वांत लहान वयाचे सदस्य होते ते म्हणजे प्रिन्स विलियम यांची दोन मुले. प्रिन्स जॉर्ज हा नऊ वर्षांचा, तर प्रिन्सेस शार्लोट ही अवघ्या सात वर्षांची आहे. त्या दोन लहानग्यांकडेही सर्वांचे लक्ष लागले होते.7 / 11बिग बेन घड्याळाने दिले दर मिनिटाला ९६ टोले लंडनमधील वेस्टमिन्स्टर पॅलेसच्या उत्तर बाजूस एका टॉवरवर असलेले प्रचंड मोठे घड्याळ व त्या घड्याळ्याला असलेली महाकाय घंटा यांना बिग बेन म्हटले जाते. राणी एलिझाबेथ यांची अंत्ययात्रा निघाली त्यावेळी या बिग बेन घड्याळाने दर मिनिटाला ६० ऐवजी ९६ टोले दिले. 8 / 11याचे कारण राणी एलिझाबेथ यांचे वय निधनसमयी ९६ वर्षांचे होते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वर्षाकरिता बिग बेन घड्याळाने एक टोला असे ९६ टोले वाजविले. 9 / 11एलिझाबेथ यांना तोफांची सलामी राणी एलिझाबेथ यांची अंत्ययात्रा वेस्टमिन्स्टर हॉल येथून वेलिंग्टन आर्चच्या दिशेने निघाली त्यावेळी त्यात राजे चार्ल्स तृतीय, त्यांची पत्नी कॅमिला, त्यांचे दोन पुत्र विलियम, हॅरी व त्यांच्या पत्नी मुले असा सारा राजपरिवार सामील झाला होता. ही अंत्ययात्रा पार्लमेंट स्क्वेअर, पार्लमेंट स्ट्रीट, व्हाईटहॉल. हॉर्स गार्ड्स, द मॉल, क्वीन्स गार्डन्स, कॉन्स्टिट्यूशन हिल अशा मार्गाने वेलिंग्टन आर्चच्या दिशेने रवाना झाली. त्यावेळी राणी एलिझाबेथ यांना तोफांची सलामी देण्यात आली.10 / 11लंडन येथे सोमवारी महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी बंदोबस्ताला असलेल्यांपैकी एक पोलीस अधिकारी बेशुद्ध पडला. त्याला उपचारांसाठी स्ट्रेचरवरून तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.11 / 11ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना सोमवारी लंडनमध्ये अखेरचा निरोप देण्यात आला. त्यानिमित्ताने मुंबईच्या डबेवाल्यांनी त्यांच्या कार्यालयात एलिझाबेथ यांच्या छायाचित्रासमोर मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहिली. आणखी वाचा Subscribe to Notifications