queens elizabeth ii residence buckingham palace in london inside images
Queen Elizabeth II : बाबो, किती हा भव्यदिव्य! राणीच्या राजवाड्यात 40,000 बल्ब लागायचे; मग खोल्या किती असतील? By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 12:09 PM1 / 12ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीयचं (Queen Elizabeth II) स्कॉटलॅंडच्या बाल्मोरल कॅसलमध्ये निधन झालं. 96व्या वयात त्या जगाला सोडून गेल्या. एलिजाबेथ द्वितीय 1952 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर ब्रिटनची राणी झाली होती. त्यावेळी तिचं वय केवळ 25 वर्षे होतं. ती जगातली एकुलती एक अशी व्यक्ती होती जिला परदेश दौरा करताना व्हिसा किंवा पासपोर्टची गरज पडत नव्हती. 2 / 12सध्याच्या स्थितीत 15 देशांची महाराणी राहिलेली एलिजाबेथ द्वितीय आपल्या मागे अब्जो रूपयांची संपत्ती सोडून गेल्या आहे. महाराणी एलिजाबेथ द्वितीयच्या नेटवर्थबाबत वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे दावे केले जातात. Fortune नुसार, महाराणी एलिजाबेथ द्वितीय आपल्या मागे 500 मिलियन डॉलर म्हणजे 39,858,975,000 रूपयांची संपत्ती सोडून गेल्या. ही संपत्ती प्रिन्स चार्ल्सला मिळणार.3 / 12राणी एलिझाबेथ II लंडनच्या रॉयल पॅलेसमध्ये राहत होत्या. त्यांचा शाही राजवाडा बकिंघम पॅलेस म्हणून ओळखला जातो. राणीकडे विंडसर कॅसल, सँड्रिघम हाऊस आणि बालमोरल यासह इतर अनेक निवासी घरे देखील होती. परंतु त्यापैकी सर्वात प्रसिद्ध बकिंघम पॅलेस आहे. बकिंघम पॅलेस लंडनच्या मध्यभागी आहे आणि जगभरात त्याच्या भव्यतेची चर्चा आहे. (Image credit: Rct.uk) 4 / 12हा राजवाडा आतून खूप आलिशान दिसतो. बकिंघम पॅलेसजवळ व्हिक्टोरिया ट्यूब स्टेशन, ग्रीन पार्क आणि हाइड पार्क कॉर्नर आहेत. बसने या राजवाड्याभोवती फिरता येते. दुसरीकडे, जर एखाद्याला ट्रेनने जायचे असेल तर हा राजवाडा व्हिक्टोरिया कोच स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. (Image credit: Rct.uk) 5 / 12ब्रिटनच्या वेबसाइट रॉयल कलेक्शन ट्रस्ट (Rct.uk) नुसार, बकिंघम पॅलेस हे 1837 पासून ब्रिटीश शासकांचे (राजा किंवा राणी) अधिकृत निवासस्थान आहे. राणी एलिझाबेथ II यांचा हा शाही महल दर उन्हाळ्यात पर्यटकांसाठी खुला केला जातो. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, या शाही घराची किंमत सुमारे 341 अब्ज रुपये आहे. (Image credit: Rct.uk) 6 / 12Rct.uk नुसार, बकिंघम पॅलेस, राणी एलिझाबेथ II यांच्या शाही राजवाड्यात 775 खोल्या आहेत. यामध्ये 19 स्टेट रूम, 52 रॉयल आणि गेस्ट बेडरूम, 188 स्टाफ बेडरूम, 92 ऑफिस आणि 78 बाथरूम यांचा समावेश आहे. (Image credit: Rct.uk) 7 / 12बकिंघम पॅलेस या शाही राजवाड्याची लांबी 108 मीटर आणि खोली 120 मीटर आहे. हा राजवाडा बघून खूप भव्य दिसतो. बकिंघम पॅलेसमध्ये अनेक राजेशाही कार्यक्रम होतात, ज्यात परदेशी राष्ट्रप्रमुखांपासून ते इतर देशांतील व्हीआयपी देखील सहभागी होतात. (Image credit: Rct.uk) 8 / 12दरवर्षी जवळपास 50,000 हून अधिक लोक बकिंघम पॅलेसमध्ये शाही मेजवानी, लंच, डिनर, रिसेप्शन आणि गार्डन पार्टीमध्ये पाहुणे म्हणून उपस्थित असतात. ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत साप्ताहिक बैठका आणि परदेशी राजदूतांचे स्वागतही याच राजवाड्यात होते. (Image credit: Rct.uk) 9 / 12उद्योग, सरकार, देणगी, क्रीडा, राष्ट्रकुल आणि जीवनाच्या इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा आदर करण्यासाठी या राजवाड्यात वर्षभर स्वागत समारंभ आयोजित केले जातात. बकिंघम पॅलेस हे अनेकदा महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांचे केंद्र असते. (Image credit: Rct.uk) 10 / 121762 पर्यंत बकिंघम हाऊस ही ड्यूक ऑफ बकिंघमची मालमत्ता होती. बकिंघम पॅलेस 'द क्वीन्स हाऊस' म्हणून ओळखला जात असे जेव्हा जॉर्ज तिसरे यांनी त्याची पत्नी, राणी शार्लोट आणि त्यांच्या मुलांसाठी खासगी घर म्हणून विकत घेतले. पॅलेसमध्ये नॅश गॅलरी देखील आहे, ज्याला क्वीन्स गॅलरी असेही म्हणतात. (Image credit: Rct.uk) 11 / 12क्वीन्स गॅलरीमध्ये जुनी मास्टर पेंटिंग्ज, अनोखे फर्निचर, सजावटीच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. बकिंघम पॅलेस उन्हाळ्यात पर्यटकांसाठी खुला असतो. दरवर्षी डिसेंबर, जानेवारी आणि इस्टरला मर्यादित संख्येने पर्यटकांसाठी खुला असतो. राजवाडा फिरण्यासाठी 2 तास 30 मिनिटांचा वेळ लागतो एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Image credit: Rct.uk) 12 / 12आता एलिजाबेथ द्वितीयनंतर त्यांचा मोठा मुलगा चार्ल्स ब्रिटनचा राजा बनला आहे. 73 वर्षीय चार्ल्स ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलॅंडसहीत 15 देशांचा प्रमुख बनला आहे. शाही परिवाराच्या नियमानुसार, चार्ल्स यालाच एलिजाबेथ यांच्यानंतर गादी सांभाळायची होती. राणीच्या मृत्यूनंतर लगेच चार्ल्सला राजा घोषित केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications