शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पेट्रोल-डिझेलसाठी लोकांच्या रांगा; श्रीलंकेकडे इंधन खरेदीसाठी पैसे नाहीत; परकीय चलनाचे मोठे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 12:20 PM

1 / 7
चीनच्या कर्जाखाली दबलेल्या श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अशातच त्यांच्याकडे पेट्रोल डिझेल खरेदीसाठीही पैसे नाहीत.
2 / 7
पेट्रोल डिझेल आयात न केल्यामुळे देशातील बहुतेक पेट्रोल पंपावरील इंधन संपले असून, यामुळे जनतेमध्ये उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे. चीन याचा फायदा घेण्याची शक्यता असून, भारताने या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहणे आवश्यक झाले आहे.
3 / 7
श्रीलंकेची सध्याची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे की त्याच्याकडे इंधनाच्या दोन खेपांसाठी पुरेसे अमेरिकन डॉलरही नाहीत. आज इंधनाच्या दोन खेपा आल्या आहेत, परंतु आम्ही त्याचे पैसे देऊ शकत नाही, असे श्रीलंकेचे ऊर्जामंत्री उदय गमनापिला यांनी सोमवारी सांगितले.
4 / 7
गेल्या आठवड्यात, सरकारी रिफायनरी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सांगितले की त्यांच्याकडे परदेशातून पुरवठा खरेदी करण्यासाठी रोख रक्कम नाही. सरकारने ठरवून दिलेल्या किमतीत पेट्रोल डिझेलची विक्री केल्याने कॉर्पोरेशनचे २०२१ मध्ये ४१.५ कोटी डॉलरचे नुकसान झाले आहे.
5 / 7
या महिन्यात श्रीलंकेने इंधनाची गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून ४० हजार टन डिझेल आणि पेट्रोल खरेदी केले होते.
6 / 7
परकीय चलनाच्या संकटामुळे श्रीलंकेच्या ऊर्जा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. श्रीलंका मुख्यत्वे इंधनासाठी आयातीवर अवलंबून आहे. इंधनाअभावी देशभरातील पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
7 / 7
या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इंधनाच्या किरकोळ किमती वाढ करणे तसेच इंधन आयातीवरील सीमाशुल्क कमी करणे हे दोन पर्याय दिसत असल्याचे गमनापिला म्हणाले.
टॅग्स :chinaचीनSri Lankaश्रीलंकाEconomyअर्थव्यवस्था