Rahul Gandhi meet Ilhan Omar leader who has repeatedly made anti India statements in US
राहुल गांधींसोबत दिसलेल्या इल्हान उमर कोण? भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या खासदारामुळे नवा वाद By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 7:42 PM1 / 9लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी राहुल यांनी वॉशिंग्टनमधील रेबर्न हाऊसमध्ये अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांची भेट घेतली. यामध्ये ब्रॅडली जेम्स शर्मन (होस्ट), जोनाथन जॅक्सन, रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती, बार्बरा ली, श्री ठाणेदार, येशू जी. गार्सिया, इल्हान ओमर, हँक जॉन्सन आणि जॅन शाकोव्स्की यांचा समावेश होता.2 / 9मात्र राहुल गांधी यांच्या अमेरिकन डेमोक्रॅट मुस्लिम खासदार इल्हान उमर यांच्या भेटीला विरोध सुरू झाला आहे. राहुल गांधींच्या उमर यांच्या भेटीवर सोशल मीडियावर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.3 / 9विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची वॉशिंग्टनमध्ये अनेकदा भारतविरोधी वक्तव्ये करणाऱ्या अमेरिकन खासदार इल्हान ओमर यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून राजकीय वादळ उठले आहे. इल्हान उमर या भारतविरोधी भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. गेल्या वर्षी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर उमर यांनी बहिष्कार टाकला होता.4 / 9राहुल गांधी यांच्या इल्हान यांच्या भेटीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रश्न उपस्थित केला. इल्हान उमरला तिच्या पाकिस्तानवरील प्रेमासाठी ओळखले जाते. इल्हान उमरचा पाकिस्तानबाबत नेहमीच नरम दृष्टिकोन राहिला आहे, असे गोयल यांनी म्हटलं आहे.5 / 9इल्हान उमर २०१९ पासून अमेरिकन काँग्रेसच्या डेमोक्रॅटिक सदस्य आहेत. त्या मिनेसोटाच्या पाचव्या काँग्रेसनल जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करते. ओमर या काँग्रेसमधील पहिल्या सोमाली अमेरिकन आणि मिनेसोटाचे प्रतिनिधित्व करणारी पहिली कृष्णवर्णीय महिला आहेत. अमेरिकन काँग्रेसमध्ये निवडून आलेल्या पहिल्या दोन मुस्लिम महिलांपैकी त्या एक आहेत. 6 / 9इल्हान उमरचा जन्म सोमालियातील मोगादिशू येथे झाला. १९९१ मध्ये सोमाली गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर लगेचच ओमरने तिच्या कुटुंबासह देश सोडून पळ काढला. १९९५ मध्ये अमेरिकेमध्ये आश्रय मिळण्यापूर्वी त्यांनी केनियाच्या निर्वासित शिबिरात चार वर्षे घालवली. ज्यूंबद्दल द्वेषपूर्ण विधानांमुळे त्या अनेकदा निशाण्यावर आल्या आहेत.7 / 9नुकतेच, भारत आणि कॅनडामधील राजनैतिक तणावावर, ओमर यांनी शीख फुटीरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताच्या कथित भूमिकेच्या कॅनडाच्या तपासाला अमेरिकेने पूर्ण समर्थन द्यावे, असं म्हटलं होतं.8 / 9इल्हान उमर या भारतविरोधी म्हणून ओळखले जातात. इल्हान २०२२ मध्ये पाकिस्तानला भेट देण्यासाठी आल्या होता. यादरम्यान त्या पाकव्याप्त काश्मीरमध्येही गेल्या होत्या. भारताने त्यांच्या दौऱ्यावर तीव्र आक्षेप व्यक्त करत निषेध व्यक्त केला. यानंतर बायडेन प्रशासनाला या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले. 9 / 9भारताच्या आक्षेपानंतर अमेरिकन सरकारने इल्हानच्या दौऱ्यापासून स्वतःला दूर केले होते. त्यांचा दौरा अमेरिकन सरकारने प्रायोजित केला नसल्याचे सरकारने म्हटले. अमेरिका आपले सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप इम्रान करत होते. त्यानंतरही इल्हान उमर पाकिस्तानात गेल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications