recovered coronavirus patients blood selling at dark web kkg
CoronaVirus News: कोरोनातून बऱ्या झालेल्यांच्या रक्ताची ऑनलाईन विक्री; किंमत पाहून चक्रावून जाल By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 3:58 PM1 / 10जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ३४ लाखांच्या घरात गेला आहे.2 / 10कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास २ लाख ४० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.3 / 10कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्ताची इंटरनेटवर अवैध विक्री केली जात आहे.4 / 10कोरोनाचे उपचार आणि लसीच्या नावाखाली बऱ्या झालेल्या रुग्णांचं रक्त डार्कनेटवर विकलं जात आहे. 5 / 10डार्कनेटवरील विक्रेते विविध देशांमधून कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्ताची विक्री करत आहेत.6 / 10रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असल्याचा दावा करत कोरोनावर मात केलेल्यांच्या रक्ताची विक्री केली जात आहे.7 / 10कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचं रक्त प्रति लीटर १० लाख रुपयांना विकलं जात आहे.8 / 10कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींच्या रक्तासोबतच पीपीई, मास्क, टेस्ट किट यासह इतर सामानदेखील चढ्या दरानं विकलं जात आहे.9 / 10ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विद्यापीठाच्या अहवालानुसार कमीत कमी १२ डार्कनेटवर रक्तासोबतच पीपीई, मास्क, टेस्ट किटची विक्री केली जात आहे.10 / 10डार्कनेटवर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू जगभरात पोहोचवल्या जात आहेत. हा प्रकार अवैध असून तो धोकादाक असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विद्यापीठानं अहवालात म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications