शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फ्रिजमध्ये असतं हे खास बटण, दाबताच चालेल एकदम नव्यासारखा, १० वर्षांनी वाढेल फ्रिजचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 4:47 PM

1 / 6
आजकाल घरामध्ये फ्रिज असणं ही सामान्य बाब बनली आहे. शहर असो वा गाव, फ्रिज आता किचनचा अविभाज्य भाग बनलेला आहे. भारतात अजूनही बहुतांश घरांमध्ये सिंगल डोअर फ्रिज असतात. तसेच या फ्रिजमध्ये एक खास बटण असतं. या बटणबाबत अनेकांना फारशी माहिती नसते. मात्र या बटणाचा योग्य वापर केल्यास ते खूप उपयोगी ठरू शकते. आज आपण जाणून घेऊयात या खास बटणाविषयी.
2 / 6
जेव्हा फ्रिजरमध्ये बर्फ गोळा होतो. तेव्हा फ्रिजरला थंड ठेवण्यासाठी अधिकाधिक मेहनत घ्यावी लागते. हा बर्फ एकप्रकारे insulatorचं काम करतो. त्यामुळे फ्रिज थंड ठेवण्यासाठी अधिकाधिक विजेचा वापर करावा लागतो. मात्र हे खास बटण दाबून डिफ्रॉस्ट केल्याने हा अतिरिक्त बर्फ हटवला जातो. त्यामुळे फ्रिजरवर फारसा ताण येत नाही. तसेच वीजही कमी लागते.
3 / 6
फ्रिजरमध्ये अधिक प्रमाणात बर्फ तयार झाल्यास मोटरवर अधिकाधिक दबाव पडतो. तसेच तो मोटरीला खराब करू शकतो. मात्र डिफ्रॉस्ट केल्याने फ्रिजरच्या मोटरवर कमी दबाव पडतो. तसेच त्याचं वयही मोठ्या प्रमाणात वाढतं.
4 / 6
मात्र बर्फ हटवल्याने फ्रिजर थंड हवा समानपणे पसरवू शकतो. त्यामुळे तु्म्हाला भोजन थंड ठेवण्यास मदत मिळते. तर जेव्हा बर्फ पसरलेला असतो, तेव्हा हवा व्यवस्थित पसरू शकत नाही. त्यामुळे फ्रिजरचा काही भाग थंड तर काही भाग गरम राहतो.
5 / 6
त्याबरोबरच बर्फ हटल्यावर फ्रिजरमध्ये अधिक जागाही मोकळी होते. त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक सामान फ्रिजरमध्ये ठेवता येते.
6 / 6
तसेच डिफ्रॉस्ट करताना तुम्ही फ्रिजरला आतमधून व्यवस्थित साफही करू शकता. विरघळलेल्या बर्फाचं पाणी बाहेर पडताना तुम्ही फ्रिजरच्या आत साठलेली मळही बाहेर काढू शकता. त्यामुळे फ्रिजर स्वच्छ राहून त्यात ठेवण्याच येणारे अन्नपदार्थही सुरक्षित राहू शकतात.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानkitchen tipsकिचन टिप्स