शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bushra Bibi Imran Khan's Wife Trending: भारताशी जुने नाते! इम्रान खानची पत्नी बुशरा बीबीकडून ब्लॅक मॅजिक; अवघ्या जगासाठी बनली रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 1:40 PM

1 / 13
पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या हातात आता काही तासच उरले आहेत. ३१ मार्चला त्यांना पायऊतार व्हावे लागण्याची शक्यता आहे. याची पूरती सोय पाकिस्तानी लष्कर आणि विरोधी पक्षांनी केली आहे. असे असताना इम्रान खान यांना या संकटातून वाचविण्यासाठी त्यांची रहस्य बनलेली पत्नी बुशरा बीबी ब्लॅक मॅजिक करत असल्याचे समोर आले आहे.
2 / 13
इम्रान खान गेल्या काही दिवसांपासून रॅलीवर रॅली काढत लष्कर आणि विरोधकांवर दबाव टाकत आहेत. त्यातच स्वत:ला पीर म्हणवणारी इम्रान खान यांची तिसरी पत्नी एक रहस्यच बनली आहे. तिने इम्रान खान यांच्या अधिकृत निवासस्थानी काळी जादू करण्यास सुरुवात केली आहे.
3 / 13
तिथे जिवंत कोंबडे जाळले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. इम्रानच्या पार्ट्यांमध्ये ही त्याची पत्नी बुशरा बीबी गॉड मदर असते. तिच्यावर विरोधकांनी तीन अब्ज पाकिस्तानी रुपये लाच घेतल्याचा आरोप केला आहे. या बुशरा बीबीचे भारताशी कनेक्शन आहे.
4 / 13
२०१९ मध्ये इम्रान खान युएनच्या महासभेतून काश्मीरवर भारतविरोधी भाषण देऊन पाकिस्तानात परतले होते. तेव्हाच भारताने काश्मीरमधील 370 कलम रद्द केले होते. पीटीआयने त्यांचे हिरोसारखे स्वागत केले होते. तेव्हा इम्रान खान यांनी या रहस्यमयी पत्नीचा पहिल्यांदाच उल्लेख केला होता. मी बुशरा बीबीचे आभार मानतो, तिने माझ्या भाषणासाठी प्रार्थना केली होती, असे त्यांनी म्हटले होते.
5 / 13
बुशरा बीबी ही फक्त पाकिस्तानची प्रथम महिलाच नाहीय. ती इम्रान खान यांची अध्यात्मिक गाईड आहे. सर्वच बाबतीत इम्रान खान तिचा सल्ला घेतात. २०१८ मध्ये त्यांनी बुशरा बीबीसोबत लग्न केले होते.
6 / 13
ती पहिलीच प्रथम महिला आहे, जी सक्तीने बुरखा घालते व आपला चेहरा, तोंड कोणालाच दाखवत नाही व जगापासूनही लांब राहते. धक्कादायक बाब म्हणजे बुशरा बीबीचा चेहरा न पाहताच इम्रान यांनी तिच्याशी लग्न केले आहे. त्यांनी तिचा लग्नाआधी चेहरा पाहिला नव्हता असा दावा केला आहे.
7 / 13
बुशरा बीबीच्या सांगण्यावरूनच पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय नोकरशाहीची नियुक्ती केली जाते, अशी चर्चा पाकिस्तानात अनेकदा केली जाते. बुशरा बीबी यांनी सांगितले की, कोणता अधिकारी तिच्या पतीला धोका देईल आणि कोणता मदत करेल. सध्याच्या पाकिस्तानातील राजकीय संकटातही बुशरा बीबीची मोठी चर्चा आहे.
8 / 13
पाकिस्तानमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या शाहबाज शरीफ यांनी दावा केला आहे की, वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी इम्रान खानच्या घरी कोंबडीचे कित्येक टन मांस जाळले जात आहे.
9 / 13
बुशरा बीबी यांनी इम्रानबाबत अनेक राजकीय भाकीत केले होते जे खरे ठरले असल्याचे सांगितले जाते. यानंतर इम्रान तिच्याकडे आकर्षित झाला. बुशरा बीबीबद्दल असे म्हटले जाते की तिचे पूर्वज हिंदू होते.
10 / 13
बुशरा बीबी ही १२व्या शतकातील सुफी संत बाबा फरीद यांची अनुयायी आहे. ती पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका गावात राहायची. बुशराला पहिल्या लग्नापासून 5 मुले आहेत.
11 / 13
इम्रान खान फरीद यांच्या दर्ग्याला जायचे तिथेच त्यांची ओळख झाली होती.
12 / 13
पिंकी पीरचे असे स्वप्न पाहिले होते की जर इम्रान खानने आपल्या कुटुंबात लग्न केले तर तो पंतप्रधान होईल. पिंकी पीरला इम्रानचे लग्न आधी तिच्या बहिणीशी आणि नंतर मुलीशी करायचे होते, पण इम्रान खान तयार नव्हता.
13 / 13
बुशरा बीबीचे भारताशी जवळचे संबंध आहेत. बुशरा ही सतलज खोऱ्यातील राजपूतांची प्रमुख बंधुत्व असलेल्या लोकप्रिय वट्टू कुळातून येते. या राजपूतांचा भट्टीशी जवळचा संबंध होता. बहावलपूरचा वट्टी समुदाय असा दावा करतो की ते जैसलमेरच्या संस्थापक राजाचे 8 वे वंशज वट्टूचे वंशज आहेत.
टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान