शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

श्रीलंकेत 1 लिटर दुधासाठी मोजावे लागतायेत 2000 रुपये, तर 1 कप चहासाठी 100 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 5:14 PM

1 / 7
भारताच्या शेजारील देश श्रीलंकेत (Sri Lanka Crisis)हाहाकार माजला आहे. रुग्णालयातील औषधे संपल्याने डॉक्टरांनी रुग्णांचे ऑपरेशन थांबवले. पेट्रोल पंपावर इंधनासाठी दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. खाद्यपदार्थ इतके महाग झाले आहेत की लोकांना उपाशी झोपावे लागत आहे.
2 / 7
याठिकाणी पेट्रोलपेक्षाही महाग दूध विकले जात आहे. कोलंबो न्यूजच्या रिपोर्टनुसार, एक लिटर दुधासाठी 2000 रुपये खर्च करावे लागतात. तसेच, श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये एका कप चहाची किंमत 100 रुपयांवर गेली आहे. मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे.
3 / 7
एक किलो बटाट्यासाठी 200 रुपये मोजावे लागतात. इंधनाच्या कमतरतेमुळे वीजनिर्मितीवरही परिणाम झाला आहे. आता अनेक शहरांमध्ये 12 ते 15 तास वीजपुरवठा खंडित होत आहे. अशा परिस्थितीत भारताने श्रीलंकेला तातडीने एक अब्ज डॉलर्स दिले आहेत.
4 / 7
श्रीलंकेवर अनेक देशांचे कर्ज आहे. येथे जानेवारीमध्ये परकीय चलनाचा साठा 70 टक्क्यांहून अधिक घसरून 2.36 अब्ज डॉलर झाला होता, जो सातत्याने घसरत आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे देशात जीवनावश्यक वस्तू, औषधे, पेट्रोल, डिझेल यापैकी बहुतांश वस्तू विदेशातून आयात केल्या जात नाहीत.
5 / 7
गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या अहवालानुसार, देशात स्वयंपाकाचा गॅस आणि विजेच्या तुटवड्यामुळे सुमारे 1,000 बेकरी बंद पडल्या आहेत आणि उर्वरित बेकरीमध्ये उत्पादन देखील योग्यरित्या तयार केले जात नाही.
6 / 7
जानेवारीतील या अहवालात नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान श्रीलंकेतील अन्नधान्य महागाई एका महिन्यात 15 टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात आले.
7 / 7
लोकांना ब्रेडचे पॅकेट 0.75 डॉलरला (150 रुपये) विकत घ्यावे लागते. एवढेच नाही तर एक किलो तांदूळ आणि साखरेचा भाव 290 रुपये किलोवर पोहोचला आहे. सध्या लोकांना एका चहासाठी 100 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. (सर्व फोटो साभार - AP)
टॅग्स :Sri Lankaश्रीलंका