शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३० वर्षानंतर तुमच्या जेवणाच्या ताटातून भात गायब होण्याची शक्यता; वैज्ञानिकांची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 7:36 PM

1 / 10
हवामान बदल, पाण्याचा अभाव आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे पुढील ३० वर्षात लोकांच्या जेवणाच्या थाळीतून भात गायब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2 / 10
इलिनोइस महाविद्यालयच्या(University of Illinois) अमेरिकेच्या एका रिसर्च कंपनीच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
3 / 10
जगात भारत हा सर्वाधिक तांदूळ उत्पादन करणारा देश आहे, याठिकाणी इलिनोइस विश्वविद्यालयाच्या रिसर्च टीमने संशोधन केले. या टीमने बनवलेल्या रिपोर्टनुसार २०५० पर्यंत तांदूळ उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून येणार आहे असं म्हटलंय.
4 / 10
संशोधन पथकाने असे नमूद केले आहे की, जमिनीच्या संवर्धनासाठी जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्पादनाच्या वेळी मर्यादित पीक न घेतल्यास भविष्यात तांदळाचे उत्पादन कमी होऊ शकते. या पथकाने बिहारमधील नॉर्मन बोरलॉग संस्थेच्या तांदूळ उत्पादन केंद्रात आपले संशोधन केले आहे.
5 / 10
या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि इलिनोइस विद्यापीठातील कृषी व जैविक अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक प्रशांत कलिता यांनी स्पष्ट केले की बदलत्या हवामानाचा तापमान, पाऊस आणि कार्बन डाय ऑक्साईड उत्पादनावर परिणाम होतो.
6 / 10
तांदळासारख्या पिकांच्या वाढीसाठी हे विशेषत: आवश्यक घटक आहेत. जर त्यांचा विपरित परिणाम झाला तर उत्पादनावर परिणाम होणार आहे. २०५० पर्यंत तांदळाचे उत्पादन आणि पाण्याची मागणी याचा अंदाज यावरून हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
7 / 10
ते म्हणाले की, प्रति किलो तांदळाच्या उत्पादनात आणि प्रक्रियेत सुमारे ४ हजार लिटर पाणी खर्च केले जाते. भात उत्पादन, उत्पन्नाचा दर आणि हवामान परिस्थितीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचे प्रमाण याचा कालिताच्या टीमने अभ्यास केला आहे.
8 / 10
तांदूळ उत्पादक शेतकरी हवामान बदलांच्या परिणामाशी सामना करण्यास कसा अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतात हे त्यांनी शोधून काढले. तांदळाचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी राबविल्या जाणार्‍या धोरणे ओळखण्यासाठी संशोधकांनी कॅम्प्युटर सिमुलेशन मॉडेल देखील तयार केले.
9 / 10
प्राध्यापक कालिता यांच्या अभ्यासानुसार भाताचे उत्पादन करणारे शेतकरी सध्याच्या पद्धतींसह शेती करत राहिल्यास त्यांच्या पिकाचे उत्पादनात २०५० पर्यंत लक्षणीय घटेल. आमचे मॉडेलिंग रिझल्ट सांगतात की, पिक वाढीची अवस्था कमी होत आहे.
10 / 10
पिकांच्या पेरणीपासून काढणीपर्यंतचा काळ जलदगतीने कमी होत आहे. यामुळे पिके वेगाने वाढत आहेत. यामुळे संपूर्ण उत्पन्नाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही.
टॅग्स :Americaअमेरिका