'Ring of Fire' seen as Indians fast asleep, watch last solar eclipse of the year photo's
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले... By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 8:43 AM1 / 5नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण लागले होते. कंकणाकृती सूर्यग्रहण, जे भारतातून दिसणार नव्हते. भारतीय झोपलेले असताना परदेशात याची विहंगम दृष्ये टिपण्यात आली आहेत. 2 / 5अवकाशात हा नजारा जवळपास सहा तास सुरु होता. २ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात झाली ती पहाटे ३ वाजून १७ मिनिटांनी ग्रहण संपले. 3 / 5भारतात हे सूर्यग्रहण दिसत नसल्याने त्याचा सूतककाळ देखील पाळायचा नव्हता. दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भाग आणि आर्क्टिक, अर्जेंटिना, ब्राझील, पेरू, फिजी, चिली, पेरू, होनोलुलू, ब्यूनस आयर्स, अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागातून दिसत होते.4 / 5रिंग ऑफ फायरमध्ये चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मधून जातो. छोटा असल्याने चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही. यामुळे चंद्र बरोबर मध्ये आला की रिंग तयार होते. ही रिंग आगीसारखी भासते, म्हणून त्याला रिंग ऑफ फायर असे म्हटले जाते. 5 / 5कोणतेही सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. सूर्यग्रहणाच्या वेळी बाहेर पडणाऱ्या हानिकारक किरणांमुळे डोळ्यांना त्रास होतो. हे ग्रहण पाहण्यासाठी खास चष्मा किंवा काळ्या काचांचा वापर केला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications