शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' द्राक्षांची किंमत ऐकुन तुम्ही म्हणाल सोनं खरेदी करणं परवडेल, घडातील एक द्राक्ष ३५ हजार रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 4:42 PM

1 / 10
तुम्ही हिरवी द्राक्षं खाल्ली असतील, काळी द्राक्षंही खाल्ली असती. या फोटोतील ही लालबुंद द्राक्ष पाहून ती खाण्याचाही मोह तुम्हाला आवडला नसेल. पण त्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तुमची तयारी हवी.
2 / 10
रुबी रोमन द्राक्षे (Ruby Roman grapes) असं या द्राक्षांचं नाव आहे. ही दिसायला जितकी सुंदर तितकीच त्याची किंमतही भारी अगदी. अगदी सोन्याच्या भावात ही द्राक्षं विकली जातात.
3 / 10
ही द्राक्ष जापानमधील असून या प्रकारच्या द्राक्षांच्या केवळ २ हजार ४०० घडांचं उत्पादन घेतलं जातं.
4 / 10
अत्यंत साध्या पद्धतीनं याची शेती केली जाते. या द्राक्षांची शेती जपानी लक्झरी फळांच्या बाजारात अत्यंत डिमांडिंग आहे.
5 / 10
२००८ मध्ये संशोधन करून नव्या प्रीमियम द्राक्षांचं वाण विकसित करण्यात आलं आहे.
6 / 10
सर्वात महागड्या द्राक्षांची निर्मिती करण्यासाठी तब्बल १४ वर्ष प्रयत्न करण्यात आले. तसेच १४ वर्ष गुंतवणूक करावी लागली. तेव्हा जाऊन ही शेती करणं शक्य झालं.
7 / 10
या द्राक्षांची विक्री होण्यापूर्वी प्रत्येक द्राक्षाची गुणवत्ता तपासली जाते. यातून जे द्राक्षे निवडली जातात त्यानंतर त्याला सर्टिफाय करण्यात येतं. ही द्राक्षे विकण्यासाठी कडक नियम आहेत.
8 / 10
या एका द्राक्षाची किंमत सुमारे ३५ हजार रुपये आहे. एक किलो द्राक्षं घ्यायची असतील तर भारतात तुम्हाला यासाठी तब्बल ७ लाख ५० हजार रुपये मोजावे लागती.
9 / 10
अधिकृत रूबी रोमन वेबसाइटनुसार ही द्राक्ष कमी आंबट असतात. त्यामध्ये साखर आणि रस यांचे प्रमाण जास्त असते. एक द्राक्ष खाताच तुमचे तोंड त्या द्राक्षाच्या रसाने पूर्णपणे भरुन जाते.
10 / 10
पिंगपाँग बॉलएवढ्या प्रत्येक द्राक्षाचं वजन २० ग्रॅम असतं इतकच नाही तर 3 सेमी पर्यंत या द्राक्षाचा आकार असू शकतो असा दावा आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेJapanजपान