शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' सुंदरीला बघताच तिच्यावर फिदा झाले होते Vladimir Putin, एक दिवस अचानक झाली गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 5:52 PM

1 / 10
यूक्रेन (Russia-Ukraine War) हल्ला केल्यापासून जगभरात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांची चर्चा सुरू आहे. या हल्ल्यानंतर त्यांची एक कठोर नेता म्हणून इमेज जगभरात तयार झाली आहे. त्यांची पर्सनल लाइफही यानिमित्ताने चर्चेत आहे. त्यांच्या मनावर एका सुंदरी अनेक वर्ष राज्य केलं होतं. ही सुंदरी होती रशियाची जिम्नास्ट एलिना काबायेवा(Alina Kabaeva).
2 / 10
एलिना काबायेवाचं नाव खेळात मिळालेल्या यशामुळे जेवढं चर्चेत नव्हतं, त्यापेक्षा जास्त प्रसिद्ध ती पुतिन यांच्यासोबतच्या नात्यामुळे झाली होती. अनेकदा ती पुतिन यांच्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसली. पण त्यांच्या नात्यावर प्रश्न विचारण्याची कधी कुणाची हिंमत झाली नाही.
3 / 10
काबायेवा रशियातील एक मोठी जिम्नास्ट राहिली आहे. २००० साली सिडनीत झालेल्या ऑलम्पिक गेम्समध्ये तिने रशियासाठी ब्रांझ पदक जिंकलं होतं. तेच २००४ मध्ये एथेंस गेम्समध्ये एलिना काबायेवा आपल्या देशासाठी गोल्ड मेडल जिंकली होती.
4 / 10
एलिना रशियातील अशा खेळाडूंपैकी होती, जिने देशांचा मान खूप वाढवला. तिने वेगवेगळ्या स्पर्धामध्ये देशासाठी १४ मेडल्स जिंकले. २०१४ मध्ये झालेल्या सोची विंटर ऑलम्पिकमध्ये ती टॉर्च बिअररच्या भूमिकेतही होती.
5 / 10
आधी ती एका पोलिसासोबत एंगेज असल्याची चर्चा समोर आली होती. पण २००५ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर २००८ पासून सतत चर्चा होऊ लागली होती की, ती ब्लादिमीर पुतिनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे नातं १ किंवा २ नाही तर चक्क ७ वर्ष चाललं.
6 / 10
२०१९ पर्यंत एलिना काबायेवा रशियात वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसत राहिली. पण गेल्या २ वर्षात तिला कुणी बघितलं नाही. ती कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातही दिसली नाही आणि इतर कुठेही दिसली नाही.
7 / 10
असं सांगितलं जातं की, एलिनाने २०१९ मध्ये मॉस्कोच्या एका क्लीनिकमध्ये जुळ्या बाळांना जन्म दिला होता. २०१५ मध्ये तिला एक मुलगी झाली होती. अफवा तर अशीही होती की, तिच्या बाळांचे वडील स्वत: ब्लादिमीर पुतिन आहेत. कारण बाळांना जन्म दिल्यानंतर एलिना रहस्यमयरित्या गायब झाली होती.
8 / 10
पुतिनसोबतचं तिचं नात नेहमीच चर्चेचा विषय होतं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन एकदा म्हणाले होते की, त्यांचंही पर्सनल आयुष्य आहे आणि त्यात ते कुणाला लुडबुड करायला परवानगी देत नाही. या गोष्टीचा सन्मान केला गेला पाहिजे. पुतिन आणि काबायेवा यांच्या नात्याची जेव्हा चर्चा होत होती तेव्हा पुतिन विवाहित होते. त्यांचा घटस्फोट २०१४ मध्ये झाला होता.
9 / 10

10 / 10

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया