Russia builds 10,000 beds hospital in just 20 days; China's record break vrd
चमत्कार! रशियानं अवघ्या २० दिवसांत उभारलं १० हजार बेड्सचं रुग्णालय; चीनचा रेकॉर्ड ब्रेक By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 9:00 PM1 / 11कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीनमधलं वुहान शहर हे कोरोनाचं केंद्रबिंदू समजलं जातं. कोरोना व्हायरस पीडित रुग्णांना स्वतंत्र वॉर्ड(विलगीकरण कक्षात)मध्ये ठेवले जाते. 2 / 11परंतु अशी व्यवस्था चीनमधील सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध नव्हती. म्हणूनच चिनी अवघ्या काही दिवसांत १ हजार बेड्सचं रुग्णालय उभारलं होतं. 3 / 11चीनचा हा रेकॉर्ड रशियानं मोडून काढला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी वुहानच्या धर्तीवर रशियानं अवघ्या २० दिवसांत १० हजार लोकांवर उपचार करण्यासाठी मोठं रुग्णालय उभारलं आहे. 4 / 11रशियानं अशा प्रकारची १८ रुग्णालये बांधली आहेत. दहा हजारांहून अधिक मजुरांच्या मेहनतीनं रुग्णालय तयार केले आहे. हे रुग्णालय उभारण्यासाठी ७०० कोटी रुपये इतका खर्च आला आहे. 5 / 11कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी रशियानं उभारलेल्या १८ रुग्णालयांमधलं हे सर्वात मोठे रुग्णालय आहे. उर्वरित रुग्णालये सैन्याने बांधली आहेत. या रुग्णालयातील अर्धे बेड्स आयसीयू आणि व्हेंटिलेटर इत्यादी सुविधांनी सुसज्ज आहेत. 6 / 11रशियाने आतापर्यंत कोरोना विषाणूशी संबंधित १० लाख चाचण्या घेतल्या आहेत. मॉस्कोचे मोठे रुग्णालय कोरोनाग्रस्त व्हीआयपींनी भरलेले आहे. 7 / 11रशियामधली कोरोनाशी संबंधित ६९% प्रकरणे ही मॉस्कोतली आहेत. 8 / 11सर्वात वाईट परिस्थिती अद्याप येणे बाकी असल्याचा इशाराही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे. 9 / 11रशियाने माणसांवरच्या उपचारासाठी लस बनवण्याचे प्रयोग सुरू केले आहेत. 10 / 11गेल्या तीन दिवसांपासून देशात दररोज जवळपास एक हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत. 11 / 11रशियामध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पार गेली असून, आतापर्यंत कोरोनानं रशियात 76 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications