russia coronavirus vaccine will be available to other countries by november
रशिया कोरोनावरील लस भारताला नोव्हेंबरपर्यंत देण्याची शक्यता, सेफ्टी डेटाही जारी करणार By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 7:54 PM1 / 10कोरोना विषाणूवर यशस्वी लस तयार करण्यात आल्याची घोषणा मंगळवारी रशियाने केली आहे. या लसीवरील संशोधनास निधी देणाऱ्या समुहाचे प्रमुख किरील दमित्रीव यांनी म्हटले आहे की, नोव्हेंबरपर्यंत रशिया अन्य देशांना ही लस पुरवू शकेल. 2 / 10यापूर्वी रशियाने म्हटले होते की, कोरोनावरील तयार करण्यात आलेली ही लस भारतासह २० देशांनी खरेदी करण्यासाठी सहमती दर्शविली आहे.3 / 10रशियाचे म्हणणे आहे की, ऑक्टोबरमध्ये आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लोकांना लस देण्याचा एक कार्यक्रम सुरू करणार आहेत. 4 / 10मात्र, रशियन लसीची फेज -3 चाचणी अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे जगभरातील तज्ज्ञ ही लस यशस्वी झाल्याचे म्हणत नाहीत. फेज-3 चाचणीचा निकाल लागल्यानंतरच या लसीविषयी ठोस माहिती समोर येईल.5 / 10सीएनएनच्या अहवालानुसार, रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (आरडीआयएफ) प्रमुख किरील दमित्रीव यांनी बुधवारी लस सुरक्षित असल्याचे सांगितले. 6 / 10हे सिद्ध करण्यासाठी आम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये डेटा प्रकाशित करू, असेही किरील दमित्रीव यांनी म्हटले आहे. आतापर्यंत रशियाने या लसीशी संबंधित वैज्ञानिक डेटा प्रकाशित केलेला नाही.7 / 10किरील दमित्रीव म्हणाले की, रशियामधील लोकांना लस देण्याचा कार्यक्रम हळूहळू सुरू होईल. उद्या आम्ही एक कोटी लोकांना ही लस देणार आहोत.8 / 10किरिल दमीत्रीव यांनी या तयार करण्यात आलेल्या लसीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी स्वतः ही लस घेतली आहे आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांनी देखील ही लस देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.9 / 10किरिल दमीत्रीव यांनी असा दावा केला आहे की, रशियाला इतर देशांकडून या लसीसाठी ऑर्डर आधीच प्राप्त झाली आहे. 10 / 10रशियन दूतावासानुसार, ब्राझीलचे पराना स्टेट लस तपासणीसाठी रशियाबरोबर करार करणार आहे. फिलिपिन्सनेही रशियन लसीला पाठिंबा दर्शविला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications