Russia designs worlds biggest doomsday bomb that can be destroy us and uk in an instant sna
रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 4:30 PM1 / 11भविष्यात रशिया आणि पश्चिमेकडील देशांचे युद्ध झालेच, तर रशिया या बॉम्बचा वापर शेवटचे शस्त्र म्हणून करू शकतो. अन्विक शक्तीने संपंन्न असलेले स्किफ मिसाइल शेवटचे शस्त्र म्हणून वापर करण्यासाठी, रशियाने तयार केले आहे. जाणून घेऊ, या बॉम्बमुळे कसा होऊ शकतो विनाश...2 / 11अमेरिका आणि इंग्लंडलाही करूशकतो उद्ध्वस्त - स्किफ क्षेपणास्त्रावर लावण्यात आलेला हा बॉम्ब सिंथेटिक किरणोत्सर्गी कोबाल्ट-60च्या वापराने समुद्राचा मोठा भाग आणि त्याचा किनारा उद्ध्वस्त करू शकतो. हे क्षेपणास्त्र 6,000 किमी अंतरापर्यंत मारा करू शकते. एवढेच नाही तर, हे क्षेपणास्त्र 60 मैल प्रती तास वेगाने आपले लक्ष्य भेदू शकते.3 / 11हा बॉम्ब तयार करण्यामागचा उद्देश, जगात रशियाचा कुणीही पराव करू शकत नाही, हा संदेश देणे असा आहे. जर वेळ आलीच तर हा बॉम्ब इंग्लंडची बेटं आणि अमेरिकेची तटांवर असलेली जहाजे क्षणात नष्ट करू शकतो आणि अनेक वर्षांपर्यंत पाण्यात विष मिसळू शकतो.4 / 11बॉम्बसाठी करावा लागतो एका विशेष जहाजाचा वापर हा बॉम्ब एवढा मोठा आहे, की याला समुद्र नेण्यासाठी एका विशेष जहाजाचा वापर करावा लागतो. हा बॉम्ब भयावह आणि दीर्घकालिन नुकसान करू शकतो. 5 / 11हा 'महाबॉम्ब' 25 मीटर लंबा आणि 100 टनांचा आहे. हा बॉम्ब समुद्राच्या पृष्ठ भागापासून 3,000 फूट खाली अनेक वर्षांपर्यंत असाच पडून राहू शकतो आणि जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा त्याचा वापर केला जाऊ शकतो. 6 / 11फेब्रुवारी महिन्यात काही तज्ज्ञांना रशियाच्या समुद्रात एक मोठी वस्तू दिसली होती. आधी त्यांना वाटले, की ती रशियाच्या त्सुनामी मेकर पोसेडॉन ड्रोनची आधूनिक अवृत्ती आहे. मात्र आता, ते स्किफ क्षेपणास्त्र होते, असे मानलेजात आहे.7 / 11पोसेडॉनची पहिली झलक, 2015 मध्ये दिसून आली होती. हे एक न्यूक्लिअर ड्रोन आहे. जे किनाऱ्यावर असलेल्या कुठल्याही शहरात स्तुनामी आणू शकते. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की या वर्षी जी गोष्ट त्यांना रशियात पाहिली, ती स्किफ क्षेपणास्तच होती.8 / 11रशिय नौदलाला सोपवण्यात आला आहे हा महाबॉम्ब - समुद्राचे परीक्षण करत असताना हा बॉम्ब रशियन जहाज अकेडमिक अलेक्झांड्रोव्हमध्ये ठेवण्यात आला होते. यानंतर हे जहाज 12 एप्रिलला सेवेरोमोर्स्क येथे आर्कटिक बंदरात रशियन नौदलाच्या ताब्यात देण्यात आले. हे जहाज नौदलाच्या गुप्त यूनिट क्रमांक 40056 च्या स्वाधीन करण्यात आले आहे. 9 / 11असेही मानले जाते, की हा बॉम्ब डागण्यासाठी या जहाजाचा लॉन्च पॅड म्हणूनही उपयोग केला जाऊ शकतो. युद्धात याचा वापर अॅटलांटिकच्या दोन्ही बाजूस असलेली बेटं उद्ध्वस्त करण्यासाठीही केला जाऊ शकतो. हा बॉम्ब, ग्रीनलँड-आइसलँड-यूके आणि नॉर्थ सीच्या जवळपासच तैनात केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.10 / 11आम्हाला कुणीही पराभूत करू शकत नाही - पश्चिमेकडील देशांना निशाणा बनवण्यासाठी रशियाने अनेक सामुद्रीक शस्त्रांची निर्मिती केली आहे. त्यापैकी स्किफ हे सर्वात आधुनिक शस्त्र आहे. पॉल शल्ट म्हणाले, स्किफ हे विनाशाचे शस्त्र वाटत आहे. रशियाला कधीही पराभूत केले जाऊ शकत नाही, हा संदेश संपूर्ण जागाला देणे, हाच या मागचा हेतू आहे. यामुळे पश्चिमेकडील देशांसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पॉल हे इंग्लंडच्या संरक्षण मंत्रालयात शस्त्र नियंत्रण संचालक म्हणून कार्यरत होते. 11 / 11रशियाचे एक जहाज नुकतेच इग्लंडच्या चॅनलमध्ये आले होते. यामुळे इग्लंडच्या शाही नौदलाला आपल्या एका जहाजाने त्याचा पाठलाग करावा लागला होता. गुरुवारीच हा खुलासा झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications