Russia flew fighter jets with the help of robots BKP
रशियाने रोबोच्या मदतीने उडवले लढाऊ विमान, अमेरिकेसह इतर देशांवर केली कुरघोडी... By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:35 PM1 / 7एकीकडे जगभरात कोरोनामुळे निर्माण झालेले संकट दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा सामना करत असतानाच रशियाने शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये अजून एक पाऊल पुढे टाकताना रोबोच्या मदतीने लढाऊ विमानाचे उड्डाण करण्याची चाचणी यशस्वी करून दाखवली आहे. 2 / 7रशियाने एसयू-५७ हे लढाऊ विमान रोबोच्या मदतीने उडवण्यात यश मिळवले. ही चाचणी यशस्वी झाली असून, यामुळे शस्त्रास्त्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा मार्ग मोकळा झाला आहे, असे रशियाची सरकारी वृत्तसंस्था आरआयए नोवोस्तीने सांगितले आहे. 3 / 7 शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वापराची आपली महत्त्वाकांक्षा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी लपवून ठेवलेली नाही. त्यामूळेच एसयू-५७ या लढाऊ विमानाला रोबोच्या मदतीने उडवण्याची चाचणी घेण्यात आली. 4 / 7 शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वापराची आपली महत्त्वाकांक्षा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी लपवून ठेवलेली नाही. त्यामूळेच एसयू-५७ या लढाऊ विमानाला रोबोच्या मदतीने उडवण्याची चाचणी घेण्यात आली. 5 / 7 रशियाचे एसयू-५७ हे पाचव्या पिढीमधील लढाऊ विमान आहे. याचे पहिले उड्डाण २०१० मध्ये झाले होते. त्यानंतर याची सीरियामध्ये चाचणी घेण्याचे आदेश ब्लादिमीर पुतीन यांनी दिले होते. 6 / 7आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा रणभूमीवरील वापर हा जगभरात वादाचा विषय राहिला आहे. शस्त्रास्त्रांमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती आर्टिफिशियल इंटेलिजेंसविरोधात मोहीम उघडणारे व्यक्त करतात. 7 / 7 दरम्यान, रशियाचे एसयू-५७ हे विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यात सक्षम आहे. तसेच कुठल्याही हवामानामध्ये हे विमान उडवता येऊ शकते. तसेच शत्रू राष्ट्राची एअर डिफेन्स सिस्टिम उदध्वस्त करण्याची क्षमताही या विमानात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications