शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 3:29 PM

1 / 7
मागच्या अडीच वर्षांपासून युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, रशियाकडून त्यांच्याकडील शस्त्रास्त्र सातत्याने अद्ययावत केली जात आहेत. दरम्यान, रविवारी रशियाच्या शस्त्रास्त्र मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.
2 / 7
रशियाकडून रविवारी RS-28 Sarmat या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात येणार होती. मात्र ही चाचणी अपयशी ठरली. एक व्यक्तीने सोशल मीडियावर सॅटेलाइट इमेज दाखवत हा दावा केला आहे.
3 / 7
अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या सरमत क्षेपणास्त्राची चाचणी रशियाच्या न्यूक्लियर डेटरेंट फोर्सेसकडून करण्यात आली होती. मात्र ही चाचणी पूर्णपणे अपयशी ठरली. या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण केल्यानंतर लगेच त्याच्यात आग लागली.
4 / 7
दरम्यान, या क्षेपणास्त्राची चाचणी अयशस्वी ठरण्याच्या आणि लॉन्च साईटवर आग लागण्यामागचं नेमकं कारण समोर येऊ शकलेलं नाही. सरमत क्षेपणास्त्रामध्ये द्रव इंधन असलेलं रॉकेट इंजिन वापरण्यात आलेलं होतं. त्यामुळे या स्फोटासोबत आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
5 / 7
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या सॅटेलाईट इमेजमध्ये लॉन्च साईटवर चार फायर ट्रक उभे दिसत आहेत. तसेच क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्यानंतर त्यामध्ये लगेचच आग लागली आणि ते प्रक्षेपणस्थळीच कोसळलं.
6 / 7
मिळत असलेल्या माहितीनुसार रशियाने २०२० च्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत RS-28 Sarmat क्षेपणास्त्राच्या ५ चाचण्या घेतल्या आहेत. मात्र त्यामधील केवळ एकच चाचणी यशस्वी ठरली होती. ही बाब रशियासाठी एक मोठा धक्का मानली जात आहे.
7 / 7
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रॉकेट इंजिनामध्ये बिघाड झाल्याने हे क्षेपणास्त्र उड्डाण करू शकलं नाही. त्यामुळे आग लागली आणि त्या आगीत प्रक्षेपण स्थळही जळून गेलं. रशिया या प्रमुख क्षेपणास्त्राला मुख्य अण्वस्र प्रतिबंधकाच्या रूपात विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
टॅग्स :russiaरशियाDefenceसंरक्षण विभागInternationalआंतरराष्ट्रीयRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया