शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रशियाची युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी पूर्ण; सॅटेलाईट फोटोंमुळे धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 6:25 PM

1 / 7
गेल्या अनेक दिवसांपासून भारतासह संपूर्ण जगाच्या नजरा युक्रेनवर खिळल्या आहेत. रशियन सैन्याने युक्रेनला वेढा घातल्याने तणाव शिगेला पोहोचला आहे.
2 / 7
युक्रेनच्या सीमेजवळ रशियन सैन्याने माघार घेतल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली होती. रशियन संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, युक्रेनच्या सीमेजवळील भागातून रशियन सैन्यदलाने रणगाडे आणि युद्धाची वाहने मागे घेण्यास सुरुवात केली आहे.
3 / 7
युक्रेनच्या पश्चिमी लष्करी भागातील रशियन आर्मी कर्मचारी आणि लष्करी उपकरणे घेऊन जाणारी एक लष्करी रेल्वे रशियाच्या लष्करी तळांवर परतली, असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं होतं. मात्र सॅटेलाईट फोटोंमुळे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
4 / 7
आता तक या वृत्तावाहिनीच्या वृत्तानूसार, युक्रेनवर हल्ला करण्याची रशियाची तयारी पूर्ण झाल्याचे सॅटेलाईट फोटोंमध्ये दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रशियाने सैन्य माघारी घेतले नसल्याचे देखील दिसून येत आहे. त्याचप्रमाणे रशियाने एक पूल देखील बांधला आहे. या पुलामुळे रशिया आणि युक्रेनमधील अंतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. या पुलावरुन रशियाला युक्रेनवर हल्ला करण्यासाठी सहज शक्य होणार आहे.
5 / 7
अमेरिकेचे संरक्षण मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी एका टीव्ही मुलाखतीत युक्रेन आणि रशियामध्ये कधीही युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.ते म्हणाले की पुतिन कधीही ट्रिगर दाबू शकतात. ते आज करू शकतात, उद्या करू शकतात किंवा पुढच्या आठवड्यात देखील युक्रेनवर हल्ला करू शकतात.
6 / 7
दरम्यान, रशियाबाबत क्वाडच्या एकमताने घेतलेल्या निर्णयाबद्दल विचारले असता, व्हाईट हाऊसचे उप प्रेस सचिव करीन जीन-पिअरे म्हणाले की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी रशिया आणि युक्रेनबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्यातील वाढलेल्या तणावावर चर्चा केली. जीन-पिअरे म्हणाले की, परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी देखील रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनलाच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला असलेल्या असलेल्या धोक्यासंदर्भात चर्चा केली.
7 / 7
युक्रेनवरील सध्याचा धोका लक्षात घेता भारतासह इतर अनेक मित्र राष्ट्रांसोबत मिळून काम करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसने सोमवारी सांगितले की, रशिया आणि युक्रेनवर हल्ल्याच्या शक्यतेबाबतच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर अमेरिका भारतासह इतर मित्र राष्ट्रांसोबत एकत्र काम करत आहे.
टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिकाIndiaभारत