शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेच्या नाकीनऊ आणणारी रशियाची बोल्ड गुप्तहेर; शत्रुराष्ट्रात अनेक वर्षे राहिली अन् अचानक...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 2:22 PM

1 / 8
एना चॅपमॅन (Former Russian super spy Anna Chapman) चं नाव काही अनोळखी नाही. मॉडलिंगच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या एनाचा एक असा इतिहास आहे ज्याने तिला रशियात हिरोचा आणि अमेरिकेत व्हिलनचा दर्जा मिळतो. २०१० साली अमेरिकेची सुरक्षा एजन्सी FBI ने रशियाच्या स्लीपर एजंटला अटक केली होती आणि मग ती रशियात रातोरात फेमस झाली होती.
2 / 8
दिसायला सुंदर असलेली एना चॅपमॅन आता ४० वर्षांची झाली आहे. ती रशियन स्लीपर एजंट म्हणून २०१० साली रशिया आणि अमेरिकेत प्रसिद्ध झाली होती. तिला रशियन-अमेरिकन स्पाय स्वॉप म्हणजे गुप्तहेरांची अदला-बदली यात रशियात परत येण्याची संधी मिळाली.
3 / 8
गुप्तहेरीतील करिअर संपल्यानंतर एना रशियात मॉडल म्हणून काम करू लागली. जेव्हा ती रॅंपवर चालायची तेव्हा फॅन तिचं सौंदर्य पाहून अवाक् व्हायचे. आता एना पुन्हा एकदा चर्चेत आहे की, कारण ती इन्स्टाग्रामवर ब्लादिमीर पुतिन यांच्या अजेंड्याचा प्रसार-प्रचार करत आहे.
4 / 8
रशिया-यूक्रेन युद्धा दरम्यान एनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यूक्रेनबाबत रशियाच्या अॅटिट्यूडचं कौतुक केलं आणि लिहिलं की, 'मी याआधी राष्ट्रभक्तीची अशी लहर आपल्या देशात आणि रशियन लोकांमध्ये दिसली नाही. यासाठी तुमचे धन्यवाद'.
5 / 8
एनाचे वडील वॅसिली कुशचेंदको हेही रशियन गुप्तचर संस्था KGB मध्ये काम करत होते आणि एनाच्या आधीच्या पतीनुसार ते फार संशयी होते. एलेक्स म्हणजे एनाचा पूर्वाश्रमीचा पती म्हणाला होता की एनाला अटक झाल्यावर त्यांना काहीच आश्चर्य झालं नव्हतं. कारण त्यांच्या परिवाराची पार्श्वभूमी गुप्तहेरांची राहिली आहे.
6 / 8
कोल्ड वॉरनंतर एना चॅपमॅन अमेरिकेत रशियाच्या गुप्तहेर नेटवर्कचा भाग नव्हती. तिने अमेरिकेत राहण्यासाठी घरही मिळवलं होतं. एनाकडे ब्रिटनची नागरिकताही आहे. कारण तिने ब्रिटिश व्यक्ती ब्रिट एलेक्स चॅपमॅनसोबत लग्न केलं होतं. पण एका वर्षातच ते वेगळे झाले होते.
7 / 8
अमेरिकेत २०१० मध्ये एनाला विदेशी सरकारसाठी गुप्तहेरी करण्यासाठी आणि षडयंत्र रचण्यात दोषी ठरवण्यात आलं होतं. तिच्यावर रशियाची एजंट म्हणून अमेरिकेत काम करण्याचा आऱोप होता. कशीतरी ती गुप्तहेरांच्या अदला-बदलीत रशियात परत येण्यास यशस्वी ठरली.
8 / 8
सामान्यपणे गुप्तहेरांना लपून ठेवलं जातं. पण एना चॅपमॅन रशियात आल्यावर स्टार बनली. तिने ऱशियन टीव्ही शो Secrets of the World होस्ट केला आणि Venture Business News magazine ची एडीटर बनली. तिला रशियातील १०० सर्वात अपीलिंग महिलांमध्ये सामिल करण्यात आलं होतं. ती नेहमीच अमेरिका आणि ब्रिटन विरोधात वक्तव्य करून चर्चेत असते.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सAmericaअमेरिका