russia suspends s400 missile system deliveries to china in another setback
चीनला मोठा धक्का; रशियाचा 'एस 400' ब्रह्मास्त्र देण्यास नकार, करार रद्द By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 3:29 PM1 / 12कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलेलं आहे. अनेक देशांना अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटात जगभरातल्या जवळपास सर्वच देशांनी चीनविरोधात आघाडी उघडली आहे. 2 / 12गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि चीन हे दोन्ही देश जवळ आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे भारताचंही काहीसं टेन्शन वाढलं होतं, पण रशियानं चीनला एक मोठा झटका दिला आहे. 3 / 12रशियाने चीनला देण्यात येणार्या एस 400 क्षेपणास्त्राची डिलिव्हरी रद्द केली आहे. विशेष म्हणजे करार रद्द झाल्यानंतर चिनी माध्यमांनी रशियाला तसं करण्यास भाग पाडल्याचा सूर आळवला आहे. 4 / 12रशियन मीडिया एजन्सी यूएवायरने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाने अशी घोषणा केली आहे की, सध्या त्यांनी एस -400 क्षेपणास्त्र यंत्रणा चीनला देण्यास थांबवलं आहे. रशियाने क्षेपणास्त्रांचा पुरवठा स्थगित केल्यावर चिनी वृत्तपत्र सोहोनं चीनच्या वतीने प्रतिक्रिया व्यक्त केली. 5 / 12रशियाला असं पाऊल उचलण्यास भाग पाडण्यात आलं आहे. कारण कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाचं त्यावरून लक्ष विचलित होईल. 6 / 12अलीकडे मॉस्कोवर बीजिंगनं हेरगिरी केल्याचा आरोप झाल्यावर रशियाने हा करार रद्द केला आहे. चीनमध्ये गोपनीय सामग्री सोपविल्याबद्दल सेंट पीटर्सबर्ग आर्कटिक सोशल सायन्स अकॅडमीचे अध्यक्ष वॅलेरी मिटको यांच्यावर आरोप असून, रशियन अधिका-यांनी त्यांना अटक केली आहे.7 / 12एस 400 क्षेपणास्त्र यंत्रणा ही एस 300ची अद्ययावत आवृत्ती आहे. हे क्षेपणास्त्र 400 किमीच्या परिघात येणारी कोणतीही विमान किंवा शस्त्रे नष्ट करू शकते. चीनने त्याच्या खरेदीसाठी 2014मध्ये रशियाबरोबर करार केला होता. 8 / 12कोरोना विषाणूमुळे आजकाल चीनवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. जगातील अनेक देशदेखील चीनविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांचे म्हणणे आहे की, अमेरिकेला चीनविरुद्ध जागतिक आघाडी तयार करायची आहे. 9 / 12अमेरिका सुरुवातीपासूनच चीनवर हल्ला करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनला मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून संबोधले आणि चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोना विषाणूच्या साथीच्या विषयाची माहिती लपवल्याचा आरोप केला. 10 / 12ट्रम्प कोरोना महामारीला 'चिनी प्लेग' म्हणत आहेत. अमेरिकेचाही चीनवर व्यापारावरून राग आहे. दुसरीकडे कोरोना व्हायरस साथीच्या आणि हाँगकाँगमुळे ब्रिटनने चीनविरुद्ध आपली भूमिका कडक केली आहे. 11 / 12अलीकडेच ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी चिनी कंपनी हुआवेईच्या 5जी नेटवर्कवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. कारण असा आरोप केला गेला होता की, ब्रिटनचा सर्व डेटा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या हातात जाऊ शकतो.12 / 12वृत्तपत्रात असेही सांगितले गेले आहे की, ही सर्वच प्रक्रिया अत्यंत जटील आहे, तसेच रशियाला आपले बरेच तांत्रिक कर्मचारी बीजिंगला पाठवावे लागतील आणि कोरोना युगातील हे एक अतिशय कठीण काम आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications