शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine Conflict: पुतिन-बायडेन चर्चा निष्फळ; महायुद्धाला दोन दिवस उरले? युक्रेन, नाटोच्या गोटात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 4:02 PM

1 / 8
रशिया येत्या दोन दिवसांत य़ुक्रेनवर हल्ला करणार असल्याचे अमेरिकेच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात तासभर चाललेली चर्चा निष्फळ ठरल्याचे अमेरिकेच्या सूत्राने सांगितले आहे. काळ्या समुद्रात रशियाची आणखी दोन युद्धनौका पोहोचल्या आहेत. यामुळे युद्ध अटळ असल्याचे बोलले जात आहे.
2 / 8
दुसरीकडे युक्रेनमध्ये देखील हालचाली वाढल्या आहेत. युक्रेनची राजधानी कीवमध्ये राजकीय आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठका वाढल्या आहेत. अमेरिकेचे सैन्य युक्रेनच्या नागरिकांना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देत आहेत. त्यातच अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा रशियन सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. रशियाने सीमेवरील सैनिकांमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आहे.
3 / 8
रविवारी जो बायडेन आणि व्लादिमिर पुतिन यांनी जवळपास १ तास चर्चा केली. यावेळी पुतिन यांना युक्रेनवर हल्ला केल्यास होणाऱ्या परिणामांबाबत सांगण्यात आले. मात्र, या चर्चेनंतरही पुतिन युद्धाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहे. आता उद्या युरोपमध्ये रशिया आणि नाटोमध्ये बैठक होणार आहे. रशियाने जाहीर केलेली शस्त्रसंधी १५ फेब्रुवारीला संपत आहे.
4 / 8
युक्रेनला घेरण्यासाठी रशियाने मिसाईल, एअर फोर्स, नेव्ही आणि स्पेशल फोर्स तेनात केल्या आहेत. याचबरोबर शस्त्रास्त्रांचा पुरवठा होण्यासाठी देखील काम केले जात आहे. थोड्या थोड्या अंतरावर डेपो उभारले जात आहेत.
5 / 8
काळ्या समुद्रात तैनात केलेल्या युद्धनौका युक्रेन उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहेत. याचबरोबर नाटोच्या सैन्याला थोपविण्यासाठी रशियाने समुद्री सीमेवर मोठ्या प्रमाणावर विनाशिका आणि डिस्ट्रॉयर तैनात केल्या आहेत.
6 / 8
अमेरिकेच्या अनधिकृत सोर्सने दिलेल्या माहितीनुसार रशिया १६ फेब्रुवारीला हल्ला करेल. तर अमेरिकन तज्ज्ञांनुसार चीनमधील ऑलिम्पिक संपण्याची रशिया वाट पाहत आहे. ते २० फेब्रुवारीला संपणार आहे. याच दिवशी रशिया युक्रेनव हल्ला करण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
7 / 8
पुतिन यांच्याशी चर्चा फिस्कटताच बायडेन यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी ५० मिनिटे चर्चा केली. वोलोडिमिर जेलेंस्की यांना जर हल्ला झालाच तर अमेरिकाही मित्रराष्ट्रांसोबत मिळून रशियाला जोरदार प्रत्युत्तर देईल असा विश्वास बायडेन यांनी दिला आहे.
8 / 8
युक्रेनवरील रशियन हल्ल्यामुळे मॉस्कोवर कठोर आर्थिक निर्बंध लादले जातील आणि नाटोकडून प्रतिहल्ला केला जाईल, असे बायडेन यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि युक्रेनने डिटरेन्स आणि डिप्लोमसीच्या रणनीतीवर सहमती दर्शवली आहे. म्हणजेच रशियाशी राजनैतिक पातळीवरील चर्चा सुरू राहतीलच, पण अमेरिका आणि युक्रेन हे दोन्ही देश आपली लष्करी तयारीही वाढवतील.
टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिकाwarयुद्ध