शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia-Ukraine Conflict: रशिया-यूक्रेन युद्धात भारत बनला आधार; ३ महिन्यांपूर्वी केलेल्या कराराचा रशियाला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 12:56 PM

1 / 12
गेल्या १२ दिवसांपासून रशिया-यूक्रेन यांच्यात घमासान युद्ध सुरू आहे. रशियाने यूक्रेनवर आक्रमक हल्ला केला आहे. यूक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाने मिसाइल डागली आहेत. यूक्रेनमध्ये बॉम्बहल्ल्याने प्रचंड नुकसान आणि जीवितहानी झाली आहे.
2 / 12
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियावर अनेक देशांनी विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या सेवा बंद केल्या असून, उत्पादने रशियात न विकण्याचा निर्णय घेतला आहे.
3 / 12
युक्रेन हल्ल्यामुळे रशियाची राजकीय तसेच आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न अन्य देशांकडून सुरू करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून रशियन बँकांना ग्लोबल पेमेंट सिस्टिममधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
4 / 12
रशियन मार्केटमधून व्हिसा, मास्टर कार्ड यांसारख्या जागतिक स्तरावर पेमेंट गेटवे देणाऱ्या कंपन्यांनी काढता पाय घेतला आहे. यामुळे रशियातील कोट्यवधी व्हिसा, मास्टर कार्डधारकांना आगामी दिवसांमध्ये व्यवहार करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
5 / 12
यातच आता आशेचा किरण म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. रशिया-युक्रेन युद्ध परिस्थितीत भारतासोबत ३ महिन्यांपूर्वी केलेल्या कराराचा रशियाला मोठा फायदा होऊ शकतो, असे सांगितले आहे. त्यामुळे रशियाला भारताचा मोठा आधार मिळणार आहे.
6 / 12
रॉयटर्सनुसार, व्हिसा आणि मास्टरकार्ड या दोन बड्या कंपन्या ९ मार्चपासून रशियातील सेवा बंद करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे रशियातील सामान्य जनतेला आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकेल.
7 / 12
मात्र, या संकटकाळात भारताची डिजिटल पेमेंट असलेली UPI आणि मेक इन इंडिया RuPay यांची मदत आता रशियाला होणार आहे. डिसेंबर २०२१ मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तसेच अनेक मुद्द्यांवर सहमती दर्शवली होती.
8 / 12
यामध्ये दोन्ही देशांनी नॅशनल पेमेंट इन्फ्रास्टक्चर असलेल्या रुपे आणि मीर कार्डला मान्यता देण्याची तयारी दर्शवली होती. याचाच एक भाग म्हणून बँक ऑफ रशिया आणि यूपीआयमध्ये फास्ट पेमेंट इंटरॅक्शनसाठी चर्चा सुरू करण्यात आली होती. यामुळे आता भारताच्या रुपे आणि युपीआय पेमेंट सिस्टिमचा रशियाला मोठा फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
9 / 12
UPI हा पूर्णपणे स्वदेशी डिजिटल पेमेंट इंटरफेस आहे. हे इतके सोपे आणि सुरक्षित आहे की यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह (फेडरल रिझर्व्ह) देखील त्याचे कौतुक केले आहे. गुगलने अमेरिकेत UPI लागू करण्याची किंवा तत्सम तंत्रज्ञान विकसित करण्याची मागणीही केली होती. आता UPI भारताबाहेरही वापरला जात आहे.
10 / 12
शेजारी देश नेपाळने नुकतेच UPI स्वीकारले आहे. भारतात Google Pay, Amazon Pay, Paytm, BHIM, BharatPe, PhonePe सारखी सर्व डिजिटल पेमेंट अॅप्स UPI इंटरफेसवर आधारित आहेत.
11 / 12
त्याचप्रमाणे, देशांतर्गत कार्ड नेटवर्क Rupay देखील गेल्या काही वर्षांत वेगाने वाढले आहे. RBI च्या आकडेवारीनुसार, २०२० मध्येच, भारतीय कार्ड मार्केटमध्ये RuPay चा हिस्सा ६० टक्क्यांहून अधिक झाला होता, तर सन २०१७ मध्ये हा वाटा केवळ १५ टक्के होता.
12 / 12
कार्ड नेटवर्कमध्ये, Visa आणि MasterCard सारख्या दिग्गजांचा भारतीय बाजारपेठेत एकत्रित वाटा ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तथापि, पेमेंट आणि व्यवहारांच्या बाबतीत व्हिसा आणि मास्टरकार्ड अजूनही रुपेपेक्षा पुढे आहेत.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनIndiaभारत