शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia-Ukraine Crisis : रशियाच्या सैन्य वाहनांवरील Z चा अर्थ काय आहे? काय आहे याचं रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 5:36 PM

1 / 9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन या आठवड्यात यूक्रेनवर हल्ला केला करत जगाला हैराण केलं. यूक्रेनच्या अनेक शहरांवर रशियन सैनिकांनी कब्जा मिळवला. अशात एका गोष्टीकडे अनेकांचं लक्ष गेलं. ती म्हणजे रशिया सैन्य गाड्यांवर Z का लिहिलेलं आहे?
2 / 9
रशियन सैन्याच्या गाड्यांवर साधारण १० वेगवेगळ्या प्रकारे Z असं निशाण बनवण्यात आलं आहे. कुठे सरळ Z लिहिला आहे. तर कुठे चौकोणी बॉक्स किंवा त्रिकोणी बॉक्समध्ये Z लिहिलं आहे. ज्याचा युद्धात वेगवेगळा अर्थ सांगितला जात आहे.
3 / 9
हे निशाण असलेल्या रशियन सैन्याच्या गाड्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रशियन डिफेन्ड पॉलिसीवर पीएचडी करत असलेला विद्यार्थी रॉब ली याने ट्विट करत सांगितलं की, हा एकप्रकारचा मोठा रेड फ्लॅग आहे. हे रोसवार्दिया ट्रूप्स आहेत. ते अशा एवटोजाक्स गाड्यांमध्ये जात आहेत, ज्यात कैद्यांना नेलं जातं. सामान्यपणे बेल्गोरॉड भागात या गाड्यांवर Z चा निशाण बनवला जातो.
4 / 9
रॉब ली म्हणाला की, हा निशाण पाहून वाटतं की, यूक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियन सेनेने रोसवार्दिया सैनिकांनाही सहभागी करून घेतलं. टेलिग्राफनुसार, रोसवार्दिया ट्रूप्सचा अर्थ होतो की, रशियन नॅशनल गार्ड. ही फोर्स रशियन आर्म्ड फोर्सपेक्षा वेगळी आहे. या सैन्याच्या तुकडी संपर्क थेट पुतिन यांच्याशी असतो.
5 / 9
रोसावार्दिया ट्रूप्सना कोणत्याही ठिकाणी घुसखोरी करण्याचं आणि कब्जा मिळवण्याचं खास ट्रेनिंग मिळालेलं असतं. रॉब ली ने ट्विटमध्ये काही फोटो शेअर करत लिहिलं की रशियन सैन्य वाहनांमध्ये TOS-1A थर्मोबेरिक MLRS आणि T-72B टॅंक्सचा समावेश आहे. जे एक दिवसाआधी क्रीमियाच्या उत्तर भागात बघण्यात आले होते.
6 / 9
काही लोक सांगतात की, रशियन सेनेने आपसात गोळीबार करून नये यासाठी आपल्या वाहनांवर Z असं लिहिलं आहे. जेणेकरून ते आपल्या देशाच्या वाहनांना ओळखू शकतील. हा एकप्रकारे युद्धात संवादाचं आणि संदेशाचं माध्यम आहे.
7 / 9
डिफेन्स थिंक टॅंक RUSI चे माजी निर्देशक प्रा. मायकल क्लार्क म्हणाले की, सामान्यपणे असे निशाण लोकेशवर आधारित असतात. हे तिकडेच बघायला मिळतात जिकडे तुकडी पुढे जात आहेत. वेगवेगळ्या देशात युद्धादरम्यान त्यांच्या वाहनांवर असे निशाण बघायला मिळतात. हा एक सिम्बॉल आहे. यामागे काही रहस्य नाही.
8 / 9
Sky News नुसार, Z निशाण यासाठी आहे की युद्धात आपली वाहने ओळखता यावी. हे समजावं की, कोणते सैन्य युद्धक्षेत्रासाठी निघाले आहेत. हे होऊ शकतं की, वेगवेगळ्या प्रकारचे Z निशाण हे वेगवेगळ्या मिशनसाठी असतील. जसे की परिवहनासाठी वेगळे, टॅंक्ससाठी वेगळे.
9 / 9
प्रा. क्लार्क म्हणाले की, वेगवेगळ्या ठिकाणांवर रशियन सेना वेगवेगळ्या खूणांचा वापर करतात. होऊ शकतं की Z ही खूण यूक्रेनच्या उत्तर-पूर्व भागासाठी वेगळं असेल आणि उत्तर-पश्मिम भागााठी वेगळं असेल. पण याबाबत सध्या ठोस माहिती नाही.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स