शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Zelensky Government: जेलेन्स्की सरकार कोसळले किंवा काही बरे वाईट झाले तर; अमेरिका प्लॅन 'B'च्या कामाला लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 12:43 PM

1 / 7
कीव: मागील 12 दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. आता रशियन सैन्याने त्यांचे हल्ले वाढवले आहेत. यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की यांच्या सरकारला कायम ठेवण्यासाठी अमेरिकेने 'प्लॅन बी'वर काम सुरू केले आहे.
2 / 7
अमेरिका एक योजना तयार करत आहे, ज्याच्या अंतर्गत रशियन सैन्याने ताब्यात घेतल्यानंतरही युक्रेनचे जेलेन्स्की सरकार पोलंडमधून सत्तेत राहील. रशियन सैन्य युक्रेनवर वेगाने पुढे जात असताना अमेरिकेने हा प्लॅन बी तयार केला आहे.
3 / 7
अमेरिकी वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने अमेरिकी प्रशासनातील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'आम्ही आपत्कालीन परिस्थितीसाठी योजना तयार करत आहोत. युक्रेनचे मित्रराष्ट्र गनिमी युद्ध सुरू ठेवण्यासाठी निर्वासित सरकार तयार करण्यास मदत करू शकतात.
4 / 7
यापूर्वी 4 मार्च रोजी रशियन संसदेच्या स्पीकरने घोषित केले होते की, जेलेन्स्की पोलंडला पळून गेले आहेत. परंतु अद्याप या दाव्याची पुष्टी झालेली नाही.
5 / 7
दरम्यान, युक्रेन सरकारकडून सांगण्यात येतंय की, राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की कीवमध्येच उपस्थित आहेत. पण, त्यांच्या नेमक्या ठिकाणाबाबत कुठलीही माहिती उघड केली जात नाहीये.
6 / 7
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा आहे की, युक्रेन सरकार देशाच्या विविध क्षेत्रांवर शासन करण्यास असमर्थ आहे. दरम्यान, नाटो देश युक्रेनवर चर्चा करण्यास तयार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता युक्रेन 'नॉन-नाटो मॉडेल'वर काम करत आहे.
7 / 7
युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'नाटो देशांकडून आम्हाला नाटोमध्ये ठेवण्याबाबत कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे आता आम्ही नाटोसाठी नाही, नॉन-नाटो मॉडेलवर काम करू.'
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन