Volodymyr Zelensky: युक्रेनच्या मुलांना वाचवू शकलो नाही, 45 वर्षांचे आयुष्य फुकट गेले; भावूक होत जेलेन्स्कींची मोठी घोषणा By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 2:44 PM1 / 9 कीव: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अनेकदा 'तिसरे महायुद्ध' हा शब्द ऐकायला मिळात आहे. 'नाटो' देशांनी या युद्धात सहभाग घेतला, तर तिसरे महायुद्ध नक्की होईल, असे स्वतः जो बायडेन यांनी म्हटले आहे.2 / 9 तिसरे महायुद्ध झाले तर ते अण्वस्त्रांनी लढले जाईल, असे रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते. आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीच तिसरे महायुद्ध सुरू झाल्याचे म्हटले आहे. 3 / 9 बुधवारी एनबीसी न्यूजशी बोलताना जेलेन्स्की म्हणाले, 'तिसरे महायुद्ध सुरू झाले का? कोणालाच माहीत नाही. पण, या युद्धात युक्रेनचा पराभव झाला तर पुढे कय होईल, हे सांगणे कठीण आहे.'4 / 9 ते पुढे म्हणाले की, 'यापूर्वीही असे घडले आहे. 80 वर्षांपूर्वी सर्वांनीच दुसरे महायुद्ध पाहिले, पण त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाबाबात कोणीही विचार केला नव्हता.'5 / 9 जेलेन्स्की पुढे म्हणाले की, अध्यक्षपद सोडण्याच्या अटीवर रशियाने युद्धविराम करण्याची अट ठेवली, तरीदेखील मी युक्रेनचे अध्यक्षपद सोडणार नाही. 6 / 9 जेलेन्स्की म्हणाले, 'मी 45 वर्षांचा आहे, आज जेव्हा 100 हून अधिक मुलांच्या हृदयाची धडधड थांबली, तेव्हा मला असे दिसले की आयुष्याची काहीच किंमत नाही माझे 45 वर्षांचे आयुष्य फुकट गेले. 7 / 9 बुधवारी यूएस संसदेला संबोधित करताना त्यांनी बायडेन यांना 'जागतिक नेता' बनण्याचे आवाहन केले आणि रशियाला रोखण्यासाठी अधिक निर्बंधांसह लढाऊ विमानांची मागणी केली.8 / 9 बायडेन यांना उद्देशून जेलेन्स्की म्हणाले, 'तुम्ही महान देशाचे नेते आहात, तुम्ही आता जगाचे नेते व्हावं. जगाचा नेता असणे म्हणजे शांततेचा नेता असणे.9 / 9 युएस संसदेत जेलेन्स्की यांनी पर्ल हार्बर आणि सप्टेंबर 11, 2001 दहशतवादी हल्ल्याची आठवण करुन दिली. तसेच, रशियाविरुद्ध युक्रेनच्या लढ्यात अधिक मदतीसाठी अमेरिकन संसदेला आवाहनही केले. आणखी वाचा Subscribe to Notifications