शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine War Updates: फ्रान्सचा युटर्न; मॅक्रों म्हणाले, "रशियाशिवाय स्थायी शांततेची चर्चा करणं अशक्य"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 12:50 PM

1 / 10
Russia Ukraine War Updates : रशिया आणि युक्रेन यांच्या दोन आठवड्यांपासून युद्ध सुरू आहे. त्यांच्यातील पहिल्या दोन टप्प्यातील चर्चा अयशस्वी ठरल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चर्चा सोमवारी पार पडली. परंतु या चर्चेतदेखील कोणताही निर्णय झाला नाही.
2 / 10
तिसऱ्या टप्प्याच्या बैठकीत ह्युमन कॉरिडोअरवर सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या एका एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या हल्ल्यानंतर तब्बल १७ लाखांपेक्षा अधिक युक्रेनी नागरिकांनी देश सोडून मध्य युरोपात आसरा घेतल्याचं म्हटलं आहे.
3 / 10
एकीकडे रशियाचे हल्ले सुरू असले तरी काही देश युद्ध थांबवण्याची मागणी करत आहेत. परंतु अशातच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रों यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
4 / 10
रशिया आणि रशियाच्या लोकांचा सन्मान करणं आवश्यक आहे. रशियाशिवाय स्थायी शांततेची चर्चा करणं अशक्य असल्याचं ते म्हणाले. यापूर्वी फ्रान्सनं या युद्धाबाबत कठोर भूमिका घेतली होती. परंतु आता त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येतंय.
5 / 10
या युद्धादरम्यान रशियाच्या क्षेपणास्त्रांनी Zhytomyr आणखी एक शाळेला निशाणा बनवल्याचा दावा युक्रेननं केला आहे. दरम्यान, शाळा बंद असल्यानं त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु आतापर्यंत त्यांनी २०२ शाळा, ३४ रुग्णालये आणि १५०० इमारतींना उद्धवस्त केल्याचा दावाही युक्रेननं केलाय.
6 / 10
या युद्धातून अजूनही रशियाला काहीही साध्य झालेलं नाही. परंतु आता रशियानं हे युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनपुढे काही अटी ठेवल्या आहेत. जर या चारही अटी मान्य केल्या, तर त्वरित युद्ध थांबवलं जाईल, असं रशियानं म्हटल्याचा दावा युक्रेनच्या माध्यमांनी केला आहे.
7 / 10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी २४ फेब्रुवारीला जेव्हा युक्रेनच्या विरोधात युद्ध पुकारलं होतं, तेव्हा आपलं ध्येय हे युक्रेनवर कब्जा करणं नसून डिमिलिटराइज करणं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. रशियानं युक्रेनसमोर त्वरीत सैन्य कारवाई बंद करण्याची अट ठेवली आहे.
8 / 10
रशिया कायमच युक्रेनच्या कोणत्याही अन्य संघटनेत दाखल होण्यावर नाराजी व्यक्त करत आला आहे. युक्रेन सातत्यानं NATO मध्ये सामिल होण्याचा प्रयत्न करत होता. तसंच आता युक्रेननं तटस्थ राहण्यासाठी आपल्या संविधानात बदल करावा असं रशियाचं म्हणणं आहे. त्यानंतर युक्रेनला NATO आणि EU मध्ये सामिल होणं अशक्य होईल.
9 / 10
युक्रेननं क्रिमियाला रशियाचा भाग म्हणून मान्यता द्यावी अशी तिसरी अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे. क्रिमिया हा यापूर्वी रशियाचाच भाग होता. परंतु १९५४ मध्ये तत्कालिन सोव्हिएत संघाचे नेता निकिता ख्रुश्चेव यांनी तो युक्रेनला भेट म्हणून दिला होता. परंतु मार्च २०१४ मध्ये हल्ला करत रशियानं क्रिमिया पुन्हा रशियाच्या ताब्यात घेतला. परंतु युक्रेन त्याला मान्यता देत नाही.
10 / 10
२०१४ मध्ये युक्रेनमधील डोनबास प्रांतातील डोनेत्स्क-लुहांस्कना फुटीरतावाद्यांनी स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं होतं. युक्रेनसोबत युद्ध सुरू होण्याचा काही दिवसांपूर्वीच रशियानं डोनेत्स्क-लुहांस्कना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती. परंतु युक्रेननं याचा विरोध केला होता.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाFranceफ्रान्सAmericaअमेरिका