शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine War: उद्ध्वस्त घरे, भयभीत लोक, रशियाच्या हल्ल्यात शहरे बेचिराख, युक्रेनमधील युद्धाचं भयावह चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 4:53 PM

1 / 9
युक्रेनवरील हल्ल्यापासून रशियन सैन्य युक्रेनमघील शहरांना सातत्याने लक्ष्य करत आहे. या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याशिवाय जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. युद्धामुळे भयग्रस्त झालेले हजारो लोक युक्रेन सोडून इतर देशांमध्ये आश्रयाला जात आहेत.
2 / 9
युक्रेनमधील चेर्निहाइव्ह शहराच्या बाहेर रशियाने मोठा हल्ला केला आहे. या फोटोमध्ये शहराच्या बाहेर असलेल्या किंका गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, याचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये वाहने आणि घरांना झालेले नुकसान दिसत आहे.
3 / 9
किव्हजवळ असलेल्या बुचा शहरावरही मंगळवारी रशियाने जबरदस्त गोळीबार केला होता. येथेही मोठ्या प्रमामात नुकसान झाले आहे.
4 / 9
रशियन सैन्यालाही बुचामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फोटोमध्ये नुकसानग्रस्त झालेले एक लष्करी वाहन दिसत आहे.
5 / 9
रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे लोकांनी युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात पलायन सुरू केले आहे. युद्धापासून वाचलेले लोक आपल्या कारमधून युक्रेन आणि रोमानियाची सीमा पार करत आहेत. येथे कारच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.
6 / 9
युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धामुळे खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तूंचा पुरवठा खंडित झाला आहे. निकोलेव्हमधील एका दुकानामध्ये रिकामी झालेले पदार्थांचे रेक्स दिसत आहेत.
7 / 9
युक्रेनमधून आतापर्यंत सहा लाखांपर्यंत अधिक लोकांनी देश सोडला आहे. या फोटोंमध्ये पश्चिम युक्रेनच्या शेहिनीजवळ पोलंडच्या सीमेकडे जाणाऱ्या कार दिसत आहेत.
8 / 9
मारियोपोलमध्येही रशियाने गोळीबार केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले. फोटोमध्ये स्टेचरवरून एका जखमी व्यक्तीला नेताना दिसत आहेत. नागरी वस्तींमध्ये झालेल्या गोळीबारात ही व्यक्ती जखमी झाली आहे.
9 / 9
खारकीव्हमध्ये युक्रेनमधील आपातकालीन सेवेतील कर्मचारी सिटी हॉलच्या इमारतीमधून मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत. रशियाने येथील सिटी हॉलजवळ हल्ला केला होता.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय