शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine War: अणुयुद्धात संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं तरी पृथ्वीवरील या पाच ठिकाणांवर होणार नाही काही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 4:43 PM

1 / 7
रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान, अण्वस्त्रांच्या वापराचाही इशारा दिला जात आहे. जर असे झाले तर पृथ्वीवर याचा काय परिणाम होईल, याची कल्पनाही करता येणार नाही. अण्वस्त्रांमध्ये ती शक्ती असते जी त्या ठिकाणाच्या विध्वंसासोबतच तेथील काही पिढ्यांवरही विपरित परिणाम घडवून आणू शकते. मात्र असे असले तरी पृथ्वीवर काही अशी ठिकाणे आहेत जी अणुयुद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वात सुरक्षित आहेत.
2 / 7
एका अंदाजानुसार सध्या पृथ्वीवर अण्वस्त्रांची संख्या १३ हजारांपेक्षा अधिक आहे. जगातील एकूण आठ देशांकडे अण्वस्त्रे आहेत. सध्या युक्रेनशी लढत असलेल्या रशियाकडेच जगातील एकूण अण्वस्त्रांच्या संख्येपैकी निम्मी म्हणजेच 6 हजार ८०० अण्वस्त्रे रशियाकडे आहेत. तर अमेरिकेकडेही हजारो अण्वस्रे आहेत. जर रशिया किंवा अमेरिकेने अण्वस्त्रांचा वापर केला तर पृथ्वी संकटात येईल. मात्र त्याही परिस्थितीत पृथ्वीवरील पाच ठिकाणे सुरक्षित राहू शकतात.
3 / 7
द सनच्या रिपोर्टनुसार अणुयुद्धादरम्यान अंटार्क्टिका खंडावर त्याचा परिणाम होणार नाही. त्याचं कारण म्हणजे १९६१ च्या जून महिन्यांमध्ये झालेला एक करार आहे. त्या करारानुसार अंटार्क्टिकामध्ये कुठल्याही प्रकारच्या लष्करी कारवाईवर बंदी घालण्यात आलेली आहे. या करारामध्ये जगातील बहुतांश अण्वस्त्रसंपन्न देशांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत या खंडामध्ये अण्वस्त्रांचा वापर होणार नाही.
4 / 7
अमेरिका हा सर्वात मोठा अण्वस्त्रसंपन्न देश असला आणि अमेरिकेचा अणुयुद्धात सहभाग झाला तरी अमेरिकेतील कोलोराडोमधील पर्वतीय भाग हा युद्धापासून सुरक्षित राहील. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी पर्वतामध्ये न्यूक्लिअर प्रुफ गुहा तयार करण्यात आलेली आहे. या गुहेच्या प्रवेशद्वारावर तब्बल २५ टन वजनाचा दरवाजा लावण्यात आलेला आहे. हा दरवाजा अणुबॉम्बसुद्धा भेदू शकणार नाही. या ठिकाणी नॉर्थ अमेरिकन एअरोस्पेस डिफेन्स कमांड आणि युनायटेड स्टेट नॉर्दन कमांडचं मुख्यालय आहे. अमेरिकेने १९६६ मध्ये सोव्हिएट युनियनच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली होती.
5 / 7
अणुयुद्धामध्ये सुरक्षित राहणारे तिसरे ठिकाण म्हणजे उत्तर ध्रुवाजवळ असलेला छोटासा देश आइसलँड आहे. वर्षभर बर्फाच्छादित राहणारा आइसलँड हा तटस्थ देश असल्याचे मानले जाते. वर्षभर बर्फाच्छादित असणारा आइसलँड हा देश तटस्थ देशा आहे. त्यामुळे या देशाकडे कुणीही शत्रू म्हणून पाहत नाही. त्यामुळे तिथे अणुहल्ला होण्याची शक्यता कमी आहे.
6 / 7
अणुहल्ल्यापासून सुरक्षित असलेले चौथे ठिकाण आहे पॅसिफिक महासागरातील बेटांवर वसलेला छोटासा देश गुआम. गुआमची लोकसंख्या केवळ १ लाख ६८ हजार एवढी आहे. येथील लष्करात केवळ १३०० सैनिक आहेत. हा देश पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे. कुठलाही देश या देशाचा शत्रू नाही. त्यामुळे येथे अणुयुद्धाची शक्यता नाही.
7 / 7
या यादीतील शेवटचे नाव काहीसे धक्कादायक आहे. सर्वसाधारणपणे इस्राइलचे अस्तित्व मिटवण्यासाठी अरब देशांकडून धमक्या येत असतात. मात्र तरीही इस्राइलवर अणुहल्ल्यांची शक्यता कमी आहे कारण येथे मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू धर्मियांची अत्यंत प्राचीन स्मारके आणि धार्मिक स्थळे आहेत. त्यांना इजा पोहोचवण्याची कुणाचीही इच्छा नाही.
टॅग्स :warयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय