शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine War: पुतीन यांच्या हाती सिक्रेट डॉक्युमेंट; केव्हाही अण्वस्त्रांचा वापर करू शकतात : रशियाचे माजी राष्ट्राध्यक्षांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 2:20 PM

1 / 8
युक्रेन युद्धात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन कोणत्याही क्षणी अण्वस्त्रांचा वापर करू शकतात, त्यांना तसे अधिकार असल्याचा दावा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष असलेल्या दिमित्र मेदवेदेव यांनी केला आहे. यामुळे जगासमोर तिसऱ्या महायुद्धाचे ढग दाटू लागले आहेत.
2 / 8
आमच्याकडे अण्वस्त्र कारवाईबाबत एक विशेष दस्तऐवज आहे. कोणत्या कोणत्या आधारावर रशियाला अण्वस्त्रे वापरण्याचा अधिकार आहे, हे त्या दस्तऐवजात स्पष्टपणे नमूद आहे. आताच्या परिस्थितीतील काही कारणे यात आहेत, असेही मेदवेदेव म्हणाले.
3 / 8
यामध्ये त्यांनी पुतीन केव्हा केव्हा शत्रूवर अण्वस्त्र हल्ला करू शकतात याची कारणे दिली आहेत. पहिले कारण म्हणजे, रशियावर अण्वस्त्र क्षेपणास्त्राने हल्ला झाला तर. दुसरे कारण म्हणजे, रशिया किंवा त्याच्या मित्र देशांवर दुसऱ्या राष्ट्राने अण्वस्त्र हल्ला केला तर.
4 / 8
तिसरे कारण असे की, रशियाच्या कोणत्याही महत्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला झाला तर, या हल्ल्याचा परिणाम अण्वस्त्रांशी संबंधीत शक्तींवर झाला तर.
5 / 8
चौथे कारण असे की, रशिया आणि त्याच्या मित्र देशांवर जर अण्वस्त्रांव्यतिरिक्त आणि देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या पारंपरिक शस्त्रांद्वारे हल्ला झाला तर रशिया अण्वस्त्रांचा वापर करू शकतो.
6 / 8
रशियाच्या या इशाऱ्याने युक्रेन युद्धावर अण्वस्त्र हल्ल्याचे ढग दाटले आहेत. गेल्या महिन्यात 24 फेब्रुवारी रोजी रशियन आक्रमण सुरू झाल्यानंतर पुतिन यांनी आपल्या अण्वस्त्र दलांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. द्धात हस्तक्षेप केला तर त्यांना इतिहासातील सर्वात भयंकर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पुतीन यांनी पाश्चात्य देशांना दिला आहे.
7 / 8
महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या या युद्धात अण्वस्त्रांचा वापर झाला, तर ती तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरेल. झेलेन्स्की यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशाराही दिला आहे.
8 / 8
वाटाघाटी अयशस्वी झाल्या तर याचा अर्थ दोन्ही देशांमधील लढाईमुळे तिसरे महायुद्ध होऊ शकते. जर तिसरे महायुद्ध झाले तर ते अण्वस्त्रांनी लढले जाईल, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले होते.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनwarयुद्ध