शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine War: या आहेत युक्रेनच्या फर्स्ट लेडी, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींच्या पत्नी; फिल्मी आहे त्यांची प्रेमकहाणी, युद्धकाळात करताहेत असं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 6:28 PM

1 / 10
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला तोंड फुटल्यापासून कणखर भूमिकेमुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की चर्चेत आहेत. दरम्यान, झेलेन्स्की आघाडीवर उतरून संपूर्ण देशाचं नेतृत्व करत आहेत. तर त्यांच्या पत्नी ओलेना याही पतीच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहेत.
2 / 10
ओलेना आणि व्लादिमीर झेलेन्स्की यांची ओळख प्रथम शाळेत झाली. त्यानंतर कॉलेजमध्ये भेटीगाठी झाल्या. दोघेही युक्रेनमधील क्रिवयी रीह या शहरातील आहेत. ते एकाच शाळेत शिकले. तेव्हापासून एकमेकांना ओळखत होते. दरम्यान, शालेय जीवनात त्यांची मैत्री नव्हती. मात्र कॉलेजात गेल्यावर त्यांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
3 / 10
कॉलेजमध्ये ओलेना आर्किटेक्चरचं शिक्षण घेत होत्या. तर व्लादिमीर ओलेन्स्की हे कायद्याचे शिक्षण घेत होते. आधापासून ओळख होती. त्यात भेटीगाठी होऊ लागल्या. त्यानंतर जवळपास आठ वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले.
4 / 10
अखेर दोघांनाही ६ सप्टेंबर २००३ मध्ये लग्न केले. त्यावेळी झेलेन्सी कॉमेडियन म्हणून ओळख निर्माण करत होते. या दोघांनीही मिळून एक प्रॉडक्शन हाऊस सुरू केले होते. ओलेन्स्कींच्या कॉमेडी शोच्या स्क्रिफ्टचं लेखन हे ओलेना या स्वत: लिहित असत.
5 / 10
२०१४ मध्ये युक्रेनमध्ये रशियाविरोधात असंतोष उफाळला तेव्हा झेलेन्स्कींचा चेहरा नेतृत्व म्हणून पुढे आला. मात्र ओलेना यांना त्यांचे पती कधीतरी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवतील, असे वाटलेही नव्हते. ओलेन्स्की हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा ओलेना यांना ती गोष्ट सोशल मीडियावरून समजले.
6 / 10
मात्र ओलेना यांना हे समजले तेव्हा त्या नाराज झाल्या. आपल्या पतीने निवडणूक लढवावी, राजकारणात जावं, असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं. त्यांनी विरोध केला. मात्र त्या अखेर राजी झाल्या. त्यानंतर त्यांनी पती झेलेन्स्कींसाठी प्रचार मोहीम चालवली. अखेरीस या निवडणुकीत झेलेन्सी प्रचंड बहुमताने विजयी झाले.
7 / 10
दरम्यान, रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू केल्यापासून ओलेना सोशल मीडियावर सक्रिय झाल्या आहेत. त्या आपल्या देशातील नागरिकांचा उत्साह वाढवत आहेत. त्या ट्विटरवर सातत्याने देशातील नागरिकांना संदेश देत आहेत. युक्रेनियन जनतेचा आत्मविश्वास वाढेल, असे फोटो शेअर करत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, त्या ना घाबरत आहेत ना त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. देशासाठी मृत्यू झाला तरी मला भीती वाटणार नाही.
8 / 10
अशा प्रकारचे फोटो शेअर करून त्या महिलांनाही प्रेरित करत आहेत. तसेच युद्धाच्या मैदानात उतरावे लागले, तरी मागी राहता कामा नये, असे त्या सांगत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे युक्रेनमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक आहे.
9 / 10
ओलेना आणि ओलेन्स्की यांना दोन मुले आहेत. त्यांची मोठी मुलगी साशा १९ वर्षांची आहे. तर मुलगा किरील ९ वर्षांचा आहे. मात्र त्यांनी आपल्या मुलांना सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवले आहे. तसेच मुलांचे फोटो सोशल मीडियावर येणार नाहीत, याची त्या पुरेपूर काळजी घेतात.
10 / 10
तसेच अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे पती झेलेन्स्की हे राष्ट्राध्यक्ष बनवल्याने त्या युक्रेनच्या फर्स्ट लेडी बनल्या तरी ओलेना ह्या अजूनही स्क्रीफ्ट रायटर म्हणून काम करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुले युक्रेनमधील शाळांमध्ये मुलांना चांगले पोषणमूल्य असलेला आहार मिळू लागला आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचाराविरोधातही त्या मोहीम चालवत असतात.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीयCelebrityसेलिब्रिटी