शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine War: यूक्रेनविरुद्ध पुतिन यांचा ‘मिशन कोरिया’ प्लॅन; रशिया अखेरचा डाव खेळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 6:26 PM

1 / 10
रशिया-यूक्रेन यांच्यात युद्ध आणि चर्चा दोन्ही एकसाथ सुरू आहे. परंतु अद्याप कुठलाही तोडगा निघण्याची चिन्हे नाहीत. कीव्हवर रशियाचा अद्याप कब्जा झाला नाही. यूक्रेनहून कित्येक पटीनं बलाढ्य असलेल्या रशियानं मनात आणलं तर काही तासांत किव्हवर कब्जा मिळवतील. परंतु ते असं का करत नाहीत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
2 / 10
अखेर हे युद्ध इतकं लांबवण्यामागे रशियाचा काय हेतू आहे? यूक्रेनचे सैन्य गुप्तहेर किरिलो बुडानोव यांनी यावर वेगळाच दावा केला आहे. बुडानोव यांच्या मते, रशियाचा हेतू यूक्रेनला दोन भागात विभागण्याचा आहे. जर संपूर्ण यूक्रेन मिळत नसेल तर कोरियाच्या धर्तीवर यूक्रेनचे २ तुकडे करण्याचा प्रयत्न पुतिन करतील.
3 / 10
यूक्रेनच्या गुप्तहेर प्रमुखाचा इशारा उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील दशकांपूर्वीच्या विभाजनाशी आहे. बुडानोव यांच्या या विधानानंतर यूक्रेनच्या विभाजनावर चर्चा सुरू झाली आहे. रशियाने जेव्हा क्रिमियावर कब्जा मिळवला होता. ८ वर्षापूर्वीही यूक्रेनच्या विभाजनाबाबत या चर्चेने जोर धरला होता.
4 / 10
जर पुतिन यांना वास्तविक यूक्रेनला उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया प्रमाणे विभागणी करायची असेल तर यूक्रेनचा कोणता भाग कुठे जाणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. सध्या वंश, भाषा आणि वारसा याआधारे विभागणी पूर्व आणि पश्चिम यूक्रेन यांच्यात होऊ शकते असं मानलं जात आहे.
5 / 10
कट्टर यूक्रेन मूळ लोकांना एकत्रित आणून पश्चिमी यूक्रेन बनवला जाऊ शकतो. ज्यात सध्याची विद्यमान राजधानी कीव्हचा समावेश असेल. तर रशियाचा प्रभाव असलेला पूर्व यूक्रेन हा दुसरा भाग असू शकतो. ज्यात खारकिव्ह, खेरसन, डोनेत्सक, लुन्हांससारख्या भागांचा समावेश असेल.
6 / 10
मात्र हा सर्व चर्चेतला मुद्दा आहे. कारण युद्धाच्या ३३ व्या दिवशीही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे यूक्रेनच्या भवितव्याचा निर्णय घेण्याच्या स्थितीत नाही. त्यांच्यासमोर यूक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की आव्हान देतायेत. तर अमेरिकेसह अन्य देश रशियाच्याविरोधात उतरले आहेत.
7 / 10
रशियाच्या रणनीतीबाबत यूक्रेनच्या गुप्तहेर प्रमुखांनी काही संकेत देत दावे केले आहेत. रशियाच्या ताब्यात असणाऱ्या शहरांना घेत अर्धराज्य संरचनेत बदल करू शकतो. त्यानंतर स्वातंत्र्य यूक्रेनविरोधात त्याला उभं करू शकतो. मात्र त्याला यूक्रेन कडाडून विरोध करेल असं त्यांनी सांगितले आहे.
8 / 10
मागील ३२ दिवसांपासून यूक्रेनच्या जनतेने रशियाचा किती प्रतिविरोध करू शकतो हे जगाला दाखवून दिले आहे. शहरं उद्ध्वस्त झाली परंतु लोकांची हिंमत कमी झाली नाही. रशियन टँकसमोर आजही यूक्रेनचे नागरिक मजबूतीने उभं राहत असल्याचे व्हिडीओ समोर येतात
9 / 10
या ३२ दिवसाच्या युद्धात रशियाच्या हाती काय लागलं? याचे काही पुरावे नाहीत. कीव्हसोबत २-३ प्रमुख शहरांवर रशियाला कब्जा मिळवाला लागेल. मात्र हे युद्ध आजही निर्णायक स्थिती आले नाही. या युद्धात आतापर्यंत रशियाचे दीड हजाराहून सैनिक मारले गेले आहेत.
10 / 10
विशेष म्हणजे लुहान्स्क आणि डोनेत्सक भागाला रशियाने स्वतंत्र देशाचा दर्जा दिला आहे. रशियाच्या बळावर २०१४ पासून याठिकाणी फुटिरतवाद्यांचा यूक्रेन सैन्यासोबत संघर्ष सुरू होता. बंडखोरांविरोधात यूक्रेनच्या लष्करी कारवाईमुळे रशिया-यूक्रेन युद्ध भडकल्याचं कारण बोललं जात आहे.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन