शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine War: युक्रेनसोबत रशियापेक्षाही मोठा धोका! अब्जाधीश माजी खासदाराची पत्नी पैसे लुटून पळत होती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:48 PM

1 / 8
रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि एकच पळापळ सुरु झाली. परदेशी नागरिकांसोबत युक्रेनचे नागरिक देखील पलायन करू लागले. आज या युद्धाला महिना होत आला आहे. अशावेळी खासदारांची कुटुंबेदेखील भूमीगत होऊ लागली आहेत. अशातच हंगेरीच्या सीमेवर एक ग्लॅमरस महिला पोहोचली आणि मोठी खळबळ उडाली.
2 / 8
तिच्यासोबत काही सुटकेस होत्या, त्यात तब्बल २.२ अब्ज डॉलर्स आणि युरोच्या थप्प्या होत्या. हंगेरीच्या सुरक्षा रक्षकांनी बॅगा उघडून पाहताच मोठा गौप्यस्फोट झाला. ती महिला दुसरी तिसरी कोणी नव्हती तर युक्रेनच्या अब्जाधीश खासदाराची पत्नी होती.
3 / 8
हंगेरीच्या कस्टम डिपार्टमेंटने तिला दोन दिवसांपूर्वी पकडले आहे. तेव्हा तिने हा पैसा युक्रेनी जनतेच्या मदतीसाठी परदेशातून मागविला असल्याचे कस्टमला सांगितले. परंतू, मग हा पैसा युक्रेनमध्ये जाण्याऐवजी हंगेरीमध्ये कशासाठी असा प्रश्न विचारला असता तिने हंगेरीत आश्रयाला आलेल्या युक्रेनी नागरिकांसाठी नेत असल्याचा बहाना बनविला.
4 / 8
सतत वादात असलेले युक्रेनचे टायकून आणि माजी खासदार इगोर कोटवित्स्की याची ती पत्नी होती. अनास्तासिया कोटवित्स्का ने या पैसे भरलेल्या बॅगा सोबत नेल्या होत्या. तिच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 / 8
एकेकाळी कोटवित्स्की हे युक्रेनमधील सर्वात श्रीमंत खासदार होते. त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्याची पत्नी आई होणार आहे. याच कारणामुळे ती देश सोडून जात होती. मात्र, पत्नीकडे २ अब्ज डॉलर आणि युरोच्या नोटा असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला आहे.
6 / 8
कोटवित्स्कीने सोशल मीडियावर सांगितले की, माझे सर्व पैसे युक्रेनच्या बँकांमध्ये जमा आहेत. मी तिथून काहीही काढलेले नाही. यानंतर त्याने आपले सोशल मीडिया अकाउंट बंद केले. रिपोर्टनुसार, ती दोन हंगेरियन पुरुष आणि तिच्या आईसोबत प्रवास करत होती.
7 / 8
युक्रेनमधील विलोक चेक पॉइंटवर तिच्याकडे असलेल्या पैशांची माहिती न दिल्याचा अनास्तासियावर आरोप आहे. पण हंगेरियन कस्टम अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये मिळाले. कोटवित्स्की हे युक्रेनच्या अण्वस्त्र आणि युरेनियमच्या खाणींवर त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत नियंत्रण ठेवत आहेत. मात्र, आता त्याचा काही भाग रशियाच्या ताब्यात गेला आहे.
8 / 8
युक्रेनच्या सीमेवरील सुरक्षा रक्षकांवर देखील कारवाई केली जाणार आहे. ते अशाप्रकारे तीन ते पाच टक्के कमिशन घेऊन पैसे देशाबाहेर न्यायला देत असल्याचा आरोप बिझनेसमन सेयार खुशुतोव यांनी केला आहे. त्यांनीच या प्रकरणाला वाचा फोडली होती.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया