Russia Ukraine War ukraine can defeat russia invasion nato chief stoltenberg vladimir putin zelensky
Russia Ukraine War : रशियाविरोधात युक्रेन युद्ध जिंकू शकतं, NATO प्रमुखांचा मोठा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 9:30 AM1 / 8Russia Ukraine War NATO chief : रशिया नाही, तर युक्रेन हे युद्ध जिंकू शकतो, असा दावा नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचे (NATO) प्रमुख जेन्स स्टोलटेनबर्ग स्यांनी केला आहे. बर्लिनमध्ये झालेल्या बैठकीत स्टोल्टनबर्ग यांनी नाटो देशांना युक्रेनला लष्करी मदत पाठवण्याचे आवाहन केले. 2 / 8युक्रेन हे युद्ध जिंकू शकते. युक्रेनियन आपल्या देशाचे रक्षण करत आहेत. युक्रेनला आपला पाठिंबा देत राहायला हवं, असं स्टोलटेनबर्ग यांनी स्पष्ट केलं. बर्लिन येथे झालेल्या नाटो देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत स्टोलटेनबर्ग यांनी या विषयावर भाष्य केलं.3 / 8ज्या योजनेअंतर्गत रशियानं युक्रेनवर हला केला, त्याप्रकारे हे युद्ध सुरू नाही. रशियाला युक्रेनची राजधानी कीव्हवर ताबा मिळवण्यात अपयश आलं आहे. रशियन सैनिक खारकीव्हमधून मागे हटत आहेत आणि डोनबासमध्येही त्यांचे हल्ले थांबवले, असल्याचं त्यांनी सांगितलं.4 / 8नाटो देश रशियन सैन्याला मागे हटवण्यासाठी युक्रेनला लष्करी मदत देण्यास तयार आहेत. युक्रेनला आपल्या स्वसंरक्षणासाठी जोपर्यंत आमच्या मदतीची गरज आहे, तोपर्यंत आम्ही विशेष रुपानं लष्करी समर्थनासाठी ना तर आपण झुकलं पाहिजे, ना सोडलं पाहिजे,” अशी प्रतिक्रिया जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अॅनालेना बेरबॉक यांनी बैठकीदरम्यान दिली.5 / 8फिनलँडकडून नाटोमध्ये सामिल होण्यास तयार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. फिनलँडचं सदस्यत्व आमची सुरक्षा वाढवेस. याशिवाय नाटोचा दरवाजा प्रत्येकासाठी खुला असल्याचंही याद्वारे दिसून येईल, असं स्टोलनबर्ग म्हणाले.6 / 8फिनलँडने कसल्याही प्रकारचा वेळ न दवडता, नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज करायला हवा, असे फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांनी एका संयुक्त प्रेस रिलीजद्वारे म्हटलं होतं. फिनलँडच्या या वक्तव्यानंतर, रशियानं संताप व्यक्त केला होता.7 / 8एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, फिनलँड नाटोचा सदस्य होणे, हे रशियासाठी धोक्याचे असेल, असे क्रेमलिननं म्हटलं तर नाटोमध्ये फिनलँडचा प्रवेश सुरळीत आणि लवकरात लवकर होईल, असे नाटो प्रमुख स्टोलटनबर्ग यांनी म्हटले आहे.8 / 8२४ फेब्रुवारी रोजी रशियानं युक्रेनविरोधात लष्करी कारवाई सुरू केली होती. तेव्हापासूनच फिनलँड आणि स्वीडन नाटोमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं सरकतार फिनलँड आणि स्वीडन यांच्या नाटो सदस्यत्वाचं समर्थन करणार असल्याचं म्हटलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications