Russia-Ukraine War: US big help to Ukraine, Dangerous 'Ghost Drones' to Attack Russia
Russia-Ukraine War: अमेरिकेची युक्रेनला मोठी मदत, रशियावर हल्ला करण्यासाठी दिले घातक 'घोस्ट ड्रोन्स' By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 3:06 PM1 / 12 Russia-Ukraine War: रशियाविरोधात युद्ध लढण्यासाठी अमेरिका युक्रेनला सातत्याने नवनवीन शस्त्रे देत आहे. आता अमेरिका युक्रेनला घोस्ट (Ghost Drone) ड्रोन देणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे ड्रोन एकदा वापरल्यानंतर त्याचा पुन्हा उपयोग होत नाही. कारण रशियन तळ, रणगाडे, सैनिक किंवा विमाने नष्ट केल्यानंतर हे ड्रोन स्वतःही नष्ट होते. म्हणजेच हे आत्मघाती घोस्ट ड्रोन आहे. अमेरिका युक्रेनला असे 121 ड्रोन देणार आहे.2 / 12 या ड्रोनचे नाव 'फिनिक्स घोस्ट टॅक्टिकल अनमॅन्ड एरियल सिस्टम्स' आहे. युक्रेनच्या डॉनबास प्रदेशात याचा पहिला वापर होण्याची शक्यता आहे. मैदानी प्रदेशात मारा करण्यासाठी हे सर्वोत्तम हत्यार आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, युक्रेनच्या डॉनबासमध्ये रशियन हल्ले रोखण्यासाठी हे सर्वात अचूक शस्त्र ठरेल.3 / 12 रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जॉन किर्बीने सांगितले की, हे ड्रोन रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी बनवले होते. पण सध्या युक्रेनमध्ये त्याची गरज आहे. भविष्यातही आम्ही त्याचा विकास करत राहू. हे ड्रोन रशियन रणगाडे, चिलखती वाहनांना नष्ट करण्यासाठी योग्य आहे. हे एक स्विचब्लेड ड्रोन(बाहुबली चित्रपटात भल्लालदेवाच्या शस्त्राप्रमाणे)असून, याचा स्फोटही होतो. याच्या समोर येणारी कोणतीही वस्तू नष्ट होते.4 / 12 फिनिक्स घोस्ट ड्रोन एक आत्मघाती ड्रोन आहे. एकदा ते आपल्या ठिकाणावरुन निघाल्यावर परत येत नाही. हे ड्रोन विविध लक्ष्यांवर हल्ला करू शकते. हे ड्रोन अमेरिकन संरक्षण कंपनी AEVEX Aerospace ने बनवले आहे. हे ड्रोन कमी खर्चात तयार करण्यात आले आहे. हा एक प्रकारचा लोइटरिंग म्युनिशन आहे.5 / 12 हे ड्रोन बनवणार्या कंपनीच्या Avex Aerospace च्या अधिकार्यांनी सांगितले की, फिनिक्स घोस्ट ड्रोनच्या वैशिष्ट्यांबद्दल जास्त सांगू शकत नाहीत, पण ते चालवण्यासाठी जास्त प्रशिक्षणाची गरज नाही. हे ड्रोन रशियन रणगाडे, वाहने आणि सैनिकांच्या गटांवर हल्ला करण्यासाठी एक उत्तम शस्त्र आहे.6 / 12 अमेरिकेच्या हवाई दलाने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. कॅलिफोर्नियाच्या सोलाना बीच येथे असलेल्या अव्हेक्स एरोस्पेसच्या अधिकार्यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. मुळात हे कामिकाझे सुसाईड ड्रोन आहे. कामिकाझे स्विबल ड्रोन म्हणजे काय ते समजून घेऊ.7 / 12 Kamikaze Killer Drones किंवा Switchblade Drones हे छोटे रिमोट कंट्रोलद्वारे उडणारा बॉम्ब आहे. हे सहजपणे कुठेही तैनात केले जाऊ शकते किंवा कुठूनही हल्ला केला जाऊ शकतो. त्यामध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यांमुळे तुम्ही छुपे लक्ष्य शोधून हल्ला करू शकता. हे ड्रोन डोंगर, इमारती, जंगल इत्यादींमध्ये लपलेले शत्रू शोधून त्यावर आत्मघाती हल्ला करण्यास सक्षम आहे.8 / 12 अमेरिकन कंपनी AeroVironment ने दोन प्रकारचे Switchblade Drones डिझाइन केले आहेत. सर्वात शक्तिशाली स्विचब्लेड ड्रोन 23 किलो स्विचब्लेड-600 आहे. ते 40 मिनिटे उडू शकते, तर ताशी 185 किलोमीटर वेगाने जमिनीवर कोसळते. त्यात असलेल्या स्फोटकांच्या मदतीने तो टँक्स आणि चिलखती वाहने सहज उडवू शकतो.9 / 12 हे ड्रोन रॉकेटप्रमाणे लॉन्च पॅडमधून सोडले जातात. हवेत गेल्यावर त्यांचे पंख उघडतात आणि ड्रोन ऑपरेट करणारा व्यक्ती रिमोटद्वारे याचे लक्ष्य ठरवतो. यावर लावलेल्या कॅमेऱ्याद्वारे हा आपल्या लक्ष्याच्या दिशेने सरकतो. लक्ष्य दिसताच ड्रोनमधील स्फोटकांचा स्फोट होऊन टार्गेट उद्धवस्त होते.10 / 12 2011 पासून अमेरिकेत या ड्रोनचा वापर केला जात आहे. हा ड्रोन कमालीचा यशस्वी झाला आहे. स्विचब्लेड 300 चे वजन 2.5 किलो आहे. स्विचब्लेड 600 चे वजन सुमारे 25 किलो आहे. स्विचब्लेड 300 ची लांबी फक्त 19.5 इंच आहे. तर स्विचब्लेड 600 ची लांबी 51 इंच आहे. म्हणजे 4 फुटांपेक्षा थोडे जास्त.11 / 12 स्विचब्लेड 300 ड्रोनची ऑपरेशनल रेंज 10 किमी आहे. ते 15 मिनिटे उडू शकते आणि 15 हजार फूट उंचीपर्यंत सहज जाऊ शकते. तर, स्विचब्लेड 600 ड्रोनची ऑपरेशनल रेंज 40 किमी आहे. ते 40 मिनिटे उडू शकते. लहान स्विचब्लेडचा कमाल वेग 160 किमी/तास आहे, तर स्विचब्लेड 600 चा टॉप स्पीड 185 आहे.12 / 12 स्विचब्लेड ड्रोनच्या आत, अमेरिकन शस्त्रास्त्र निर्माता रेथिऑन कंपनीने बनवलेले अचूक मार्गदर्शित मिनी-क्षेपणास्त्र स्थापित केले आहेत. त्याचे नाव पाईक आहे. हे सुमारे 770 ग्रॅम वजनाचे आहे. त्याची लांबी 43 सेंटीमीटर म्हणजे सुमारे 16.8 इंच आहे. तसे, त्याची श्रेणी 2 किलोमीटर आहे. पण एकदा स्विचब्लेड ड्रोन बसवल्यानंतर त्याची रेंज अनेक पटींनी वाढते. आणखी वाचा Subscribe to Notifications