russia-ukraine war | vladimir putin calls general sergei surovikin who known as butcher of syria
Russia Ukraine War: युद्ध जिंकण्यासाठी पुतिन यांची रणनीती; या 'कसाई'वर सोपवली युद्धाची जबाबदारी By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 7:17 PM1 / 6 General Sergei Surovikin known as Butcher of Syria: गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आणखी चिघळत चालले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने युक्रेनवर अनेक क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत, ज्यातून युक्रेनला सावरण्यासाठी अनेक वर्षे लागतील. अलीकडेच क्रिमियाला जोडणाऱ्या पुलावर युक्रेनने हल्ला केल्यानंतर, रशियाने हल्ले तीव्र केले. 2 / 6 युक्रेनदेखील रशियाचा जोरदार मुकाबला करत आहे. अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू असून, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना यश आलेले नाही. यातच आता पुतिन क्रूरता आणि निर्दयीपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या 55 वर्षीय जनरल सर्गेई सुरोविकिन (General Sergei Surovikin) यांच्याकडे युद्धाची जबाबदारी दिली आहे. सुरोविकिनला सीरियातील युद्धासाठी 'कसाई' अशी ओळख मिळाली आहे.3 / 6 आंदोलकांवर लष्करी वाहने चढवली- 55 वर्षीय सुरोविकिन हे रशियाच्या युद्धातील अनुभवी अधिकारी आहेत. जनरल सुरोविकिन यांनी 1980 च्या उत्तरार्धात अफगाणिस्तानमध्ये सक्रिय लष्करी कारकीर्द सुरू केली. त्यावेळी परिस्थिती खूपच प्रतिकूल होती. 1991 मध्ये ते मायदेशी परतले, तेव्हा मॉस्कोमध्ये लष्कर आणि लोकशाही समर्थक आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात तीन लोक ठार झाले. 4 / 6 आंदोलकांनी वाहनांचा मार्ग रोखला, परंतु जनरल सुरोविकिन यांनी वाहनांना पुढे जाण्याचे आदेश दिले. यात वाहने आंदोलकांना तुडवत गेले. नंतर जनरलला सहा महिने तुरुंगवासही झाला, परंतु नंतर सर्व आरोप मागे घेण्यात आले. सुरोविकिनने चेचन्यामध्ये सेवा दिली आणि त्या रशियन सैन्याचा प्रमुख होता, ज्याने 2015 मध्ये अध्यक्ष बशर अल-असाद यांच्या वतीने सीरियामध्ये हस्तक्षेप केला होता. 5 / 6 मॉस्को डिफेन्स थिंक टँक सेंटर फॉर अॅनालिसिस ऑफ स्ट्रॅटेजीज अँड टेक्नॉलॉजीजचे संचालक रुस्लान पुखोव म्हणतात की, सुरोविकिन हे दुसऱ्या महायुद्धातील सोव्हिएत युनियनचे कमांडर मार्शल झुकोव्हसारखे आहेत. सुरोविकिन हा एक कठोर माणूस आहे आणि त्याला युद्ध कसे करावे आणि ते कसे जिंकायचे, हे माहित आहे.6 / 6 युक्रेनचे यूकेमधील राजदूत वदिम प्रिस्टिको म्हणाले की, “प्रत्येक वेळी ते (रशिया) धोकादायक लोकांना आणतात. हा माणूस सीरियाचा कसाई म्हणून ओळखला जातो. आम्हाला घाबरवण्यासाठी रशियाने आणखी वाईट माणूस आणला आहे, परंतु आम्ही घाबरणार नाही. ” आणखी वाचा Subscribe to Notifications