Russia vs Ukraine War ukraine j factor is harassing putin know president zelensky plan
Russia vs Ukraine War: युक्रेनच्या 'J फॅक्टर'मुळे पुतीन घाबरले; जेलेन्स्कींच्या ब्रह्मास्त्रानं रशियाला दमवले By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 3:23 PM1 / 8रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र अद्याप तरी युद्ध संपण्याची शक्यता दिसत नाही. अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले. मात्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन माघार घेण्यास तयार नाहीत. मात्र जे फॅक्टरमुळे ते चिंतेत आहेत.2 / 8बलाढ्य रशियासमोर युक्रेनचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे युक्रेननं शरणागती पत्करावी असा सल्ला देशाचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्कींना देण्यात येत आहे. शस्त्रं खाली टाका आणि रशियाच्या मागण्या मान्य करा, असं जेलेन्स्कींना सांगितलं जात आहे. मात्र जे फॅक्टरमुळे जेलेन्स्की अद्यापही लढत आहेत.3 / 8जे फॅक्टर अर्थातच जॅवेलिन क्षेपणास्त्र. रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेनं युक्रेनला जॅवेलिन क्षेपणास्त्रं दिली. अमेरिका आणि नाटो प्रत्यक्ष युद्धात युक्रेनच्या बाजूनं उतरले नसले तरी त्यांनी युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला. त्यापैकी जॅवेलिननं रशियन सैन्याला नामोहरम केलं.4 / 8जॅवेलिन क्षेपणास्त्रं हाती आल्यापासून रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनची बाजू मजबूत झाली. रशियन सैन्याचे अनेक रणगाडे युक्रेनी सैनिकांनी जॅवेलिनचा वापर करत उद्ध्वस्त केले. त्यामुळे रशियाची मोठी नाचक्की झाली. लष्करी नुकसानामुळे पुतीन यांना हादरा बसला.5 / 8जॅवेलिन क्षेपणास्त्र वजनानं हलकं आहे. मात्र हे क्षेपणास्त्र भारी पडलं आहे. जसंजसं रशियन सैन्य राजधानी कीव्हच्या दिशेनं कूच करू लागलं, तसतसा युक्रेनी लष्करानं जॅवेलिन क्षेपणास्त्राचा वापर वाढवला. रशियाचे अनेक रणगाडे, तोफा जॅवेलिननं उडवल्या. युक्रेनी सैन्यानं जॅवेलिनचं चक्रव्यूह रचलं. त्यात रशियाचे रणगाडे अलगद सापडले. 6 / 8जॅवेलिन क्षेपणास्त्राची निर्मिती अमेरिकेनं केली आहे. हे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे. वजन अतिशय कमी असल्यानं ते खांद्यावर ठेवता येतं. युक्रेनी सैनिक जॅवेलिनचा क्षेपणास्त्राचा मारा खांद्यावरूनच करत आहेत.7 / 8जॅवेलिन मिसाईल लॉन्चरचं वजन ११ ते २४ किलो असतं. त्यात डे नाईट व्हिजनही असतं. म्हणजेच रात्रीच्या अंधारातही जॅवेलिन शत्रूच्या रणगाड्यांचा वेध घेऊ शकतं. लक्ष्याचा पाठलाग करून जॅवेलिन क्षेपणास्त्र त्याचा वेध घेतं. त्यामुळे जमिनीवरील लढाईत ते अतिशय प्रभावी ठरतं.8 / 8जॅवेलिन क्षेपणास्त्राच्या मदतीनं दोन प्रकारचे हल्ले करता येतात. ड्रोन किंवा कमी उंचीवरून जात असलेल्या लढाऊ विमानाला लक्ष्य करण्यासाठी क्षेपणास्त्राचा वापर होतो. यासोबतच जमिनीवरील युद्धात रणगाडे, सैन्याची इतर वाहनं उडवण्यासाठी याचा वापर होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications