शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia vs Ukraine War: पुतीन यांचा सीक्रेट-१५ प्लान युक्रेनच्या हाती; रशियन सैन्याची पाहून अधिकाऱ्यांना भरली धडकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 10:15 PM

1 / 8
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. दोन्ही देशांमधला तणाव कायम आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्ह ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र युक्रेनी सैन्य बलाढ्य रशियाशी दोन हात करत आहे.
2 / 8
रशियन सैन्यानं कीव्हला चारही बाजूंनी वेढा दिला आहे. कीव्हवर जोरदार हल्ले सुरू आहेत. राजधानी वाचवण्यासाठी युक्रेनी सैन्य संघर्ष करत आहे. बचावात्मक पवित्रा सोडून आता युक्रेनी सैन्यानं आक्रमक रुप धारण केलं आहे. दरम्यान युक्रेननं आपल्या हाती रशियाचा सीक्रेट प्लान लागल्याचा दावा केला आहे.
3 / 8
युक्रेनवर हल्ला करण्याची योजना रशियानं १८ जानेवारीलाच आखली होती, असा युक्रेनचा दावा आहे. युक्रेनी सैन्य १५ दिवसांत शरणागती पत्करेल असा रशियाचा अंदाज होता. रशिया-युक्रेन युद्धाला आठवडा पूर्ण झाला आहे. आता रशियाकडे आठ दिवस शिल्लक आहेत.
4 / 8
रशिया पुढील आठ दिवसांत हल्ले आणखी तीव्र करेल, अशी भीती युक्रेनच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. युक्रेनच्या दाव्याला टॉप सीक्रेट लष्करी कागदपत्रांचा आधार आहे. रशियाचे सैनिक रणभूमी सोडून जात असताना काही कागदपत्रं मागे ठेऊन गेले. त्यातून ही माहिती समोर आल्याचं युक्रेननं सांगितलं.
5 / 8
युक्रेनवरील हल्ल्याची संपूर्ण योजना असलेली कागदपत्रं युक्रेनी सैन्याची हाती लागली आहे. सध्या रशियन सैन्यानं युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य केलं आहे. मात्र युक्रेनी सैन्य हार मानायला तयार नाही. शरणागती पत्करणार नसल्याची स्पष्ट भूमिका अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी घेतली आहे. त्यामुळे रशियन सैन्याला युक्रेनचे सैनिक चोख प्रत्युत्तर देत आहेत.
6 / 8
युक्रेननं रशियाचा सीक्रेट प्लान लीक करत खळबळ उडवून दिली आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धाच्या योजनेला रशियानं १८ जानेवारीलाच मंजुरी दिली होती. १५ दिवसांत संपूर्ण युक्रेनवर कब्जा करण्याची योजना रशियानं आखली असल्याचा दावा युक्रेननं सीक्रेट प्लानच्या आधारे केला आहे.
7 / 8
२० फेब्रुवारीला युद्ध सुरू करायचं आणि ६ मार्चपर्यंत विजय मिळवायचं लक्ष्य रशियानं ठेवलं होतं. कोणती तुकडी कोणत्या भागावर हल्ला करणार याची व्यूहरचना रशियानं आखली होती.
8 / 8
युक्रेनच्या हाती लागलेल्या योजनेनुसार या संपूर्ण कारवाईत चीन आणि बेलारूस सामील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युक्रेनला लागून असलेल्या मालडोवावरही हल्ले करण्याची योजना रशियानं आखली आहे. बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्या एका व्हिडीओमधूनही ही गोपनीय माहिती उघडकीस आली आहे. लुकाशेंको रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर यांचे निकटवर्तीय मानले जातात.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया