शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia vs Ukraine War: तब्बल २७ देशांचं लष्कर रशियाविरोधात मैदानात? जाणून घ्या युक्रेनचा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 8:17 PM

1 / 10
रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. दोन दिवसांत युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याची योजना रशियानं आखली होती. मात्र प्रत्यक्षात आठवडा होत आला तरीही रशियन सैन्याला कीववर कब्जा करता आलेला नाही.
2 / 10
आता युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनला युरोपियन युनियनचं सदस्यत्व मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. युक्रेनला लवकरात लवकर युरोपियन युनियनचं सदस्यत्व मिळावं यासाठी झेलेन्स्की प्रयत्नशील आहेत. पण त्यांचा मार्ग सोपा नाही.
3 / 10
युरोपियन युनियनचं सदस्यत्व मिळवण्याचे एकूण ४ टप्पे आहेत. त्यातले २ टप्पे युक्रेननं पूर्ण केले आहेत. आणखी २ टप्पे शिल्लक आहेत आणि त्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. कारण प्रक्रिया वेळखाऊ आहे.
4 / 10
पहिला टप्पा- अर्ज- युरोपियन युनियनचा सदस्य होण्यासाठी कोणत्याही देशाला सर्वप्रथम अर्ज करावा लागतो. झेलेन्स्की यांनी दोन दिवसांपूर्वीच अर्जावर स्वाक्षरी केली आहे.
5 / 10
दुसरा टप्पा- सदस्यत्वासाठी मतदान- अर्ज मंजूर करायचा की नाही यावर युरोपियन संसदेत मतदान होतं. सोमवारी अर्जावर मतदान झालं. युक्रेनच्या बाजूनं ६३७ मतं पडली. अर्ज मंजूर झाला.
6 / 10
तिसरा टप्पा- वाटाघाटी- हाच टप्पा महत्त्वाचा असतो आणि त्यात सर्वाधिक वेळ जातो. या टप्प्यात युरोपियन युनियन आणि देशात वाटाघाटी होतात. सदस्य होऊ इच्छिणारा देश युनियनचे सर्व नियम पाळेल याबद्दल चर्चा होते. युनियनचे सर्व नियम, कायदे पाळणं बंधनकारक असतं. त्यांना चलन म्हणून युरो वापरावं लागतं.
7 / 10
चौथा टप्पा- सदस्यत्व- वाटाघाटीची प्रक्रिया झाल्यावर प्रकरण युरोपियन परिषदेकडे जातं. इथेही २७ देशांची मंजुरी गरजेची असते. एकही सदस्य देश विरोधात गेल्यास सदस्यत्व दिलं जात नाही. युक्रेनच्या बाबतीत हा टप्पा अवघड आहे. युक्रेन युनियनचा सदस्य होऊ नये असं काही देशांना वाटतं.
8 / 10
एका रात्रीत युरोपियन युनियनचं सदस्य होता येत नाही. त्यासाठीची प्रक्रिया मोठी आहे. युनियनचा सदस्य होणारा सर्वात शेवटचा देश म्हणजे क्रोएशिया. २०१३ मध्ये क्रोएशिया युनियनाचा सदस्य झाला. त्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला. सर्वात कमी कालावधीत ऑस्ट्रिया, फिनलँड, स्वीडनला सदस्यत्व मिळालं. २ वर्षांत हे देश युनियनचे सदस्य झाले.
9 / 10
युरोपियन युनियनचा सदस्य असलेल्या देशावर बाहेरील देशानं आक्रमण केल्यास युनियनचे सर्व सदस्य त्याला मदत करतील, असा नियम आहे. युनियनचा सदस्य झाल्यावर २७ देश उघडपणे रशियाविरोधात मैदानात उतरतील.
10 / 10
सध्या युनियनचे सदस्य युक्रेनला लष्करी साहित्य पुरवत आहेत. पण लष्कर पाठवत नाहीत. युक्रेन युनियनचा सदस्य झाल्यावर २७ देश युक्रेनच्या मदतीला प्रत्यक्ष लष्कर पाठवू शकतील.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया