शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुतीन खवळले; रशिया आणखी दोन देशांवर हल्ला करण्याच्या तयारीत; सीमेवर क्षेपणास्त्र तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 1:31 PM

1 / 9
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला दीड महिना उलटला आहे. मात्र अद्यापही युद्ध थांबण्याचे संकेत नाहीत. युक्रेनच्या सैन्यानं कडवी झुंज दिल्यानं रशियन लष्कराचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर आता रशियानं आणखी दोन देशांवर हल्ला करण्याची तयारी सुरू केली आहे.
2 / 9
उत्तर युरोपमधील परिस्थिती तणावपूर्ण होत आहे. आर्टिकजवळ असलेल्या फिनलँड आणि स्वीडनच्या सीमेवर रशियानं पाच क्षेपणास्त्र आणि अन्य घातक शस्त्रास्त्रं तैनात केली आहेत. नाटोमध्ये सहभागी होण्याचे संकेत या दोन्ही देशांनी दिले आहेत. त्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन संतापले आहेत.
3 / 9
युक्रेननं नाटोमध्ये सहभागी होण्याचे प्रयत्न केल्यामुळेच रशियानं युद्ध घोषित केलं. आता फिनलँड आणि स्वीडन या देशांनीदेखील नाटोमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. नाटोमध्ये सहभागी व्हायचं की नाही याबद्दलचा निर्णय पुढल्या काही आठवड्यांत घेऊ, असं फिनलँडच्या पंतप्रधान साना मारिया म्हणाल्या आहेत.
4 / 9
स्वीडन आणि फिनलँड तटस्थ देश मानले जातात. मात्र युक्रेनमधील परिस्थिती पाहून त्यांनी नाटोमध्ये जाण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे रशियानं दोन्ही देशांना धमकी दिली आहे. स्वीडन आणि फिनलँड हे देश रशियाच्या जवळ आहेत. फिनलँड तर रशियाचा शेजारी आहे.
5 / 9
भविष्यात आपली अवस्था युक्रेनसारखी होईल, अशी भीती फिनलँड सरकार आणि तिथल्या जनतेला आहे. 'नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज करायचा की नाही, याबद्दल मतमतांतरं आहेत. आम्हाला सतर्कतेनं विश्लेषण करून निर्णय घ्यावा लागेल,' असं मारिया यांनी म्हटलं.
6 / 9
फिनलँड सरकारनं जनमताचा कौल घेतला. त्यात बहुतांश जनतेनं नाटोमध्ये सामील होण्याच्या बाजूनं मतदान केलं. 'आमचा देश नाटोचा भागीदार आहे. मात्र सदस्य होण्याचा अर्थ वेगळा होतो. नाटोचे सदस्य झाल्यावर आम्ही कलम ५ च्या अंतर्गत येऊ. त्यामुळे सामूहिक सुरक्षा मिळेल,' असं मारिया यांनी सांगितलं.
7 / 9
युक्रेनची अवस्था पाहून फिनलँड सरकारनं चिंता व्यक्त केली आहे. भविष्यात फिनलँडची अवस्था युक्रेनासारखी होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच नाटोचा सदस्य होण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत. तर फिनलँडला रोखण्यासाठी रशियन सरकार धमक्या देत आहे.
8 / 9
रशियानं फिनलँडच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि क्षेपणास्त्रं तैनात केली आहेत. किनारी भागातील सुरक्षेशी संबंधित असलेल्या दोन संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा के-३०० पी बास्तिओन पी सीमेजवळ आणून ठेवण्यात आल्या आहेत.
9 / 9
फिनलँडच्या जवळच रशियाची आर्थिक राजधानी सेंट पीटर्सबर्ग आहे. या शहरात रशियातील अब्जाधीश राहतात. रशियानं युद्ध पुकारल्यास फिनलँड या शहरावर हल्ले करू शकतात. फिनलँडकडे अमेरिकेनं दिलेली एफ-३५ लढाऊ विमानं आहेत. ही विमानं रडारला चकवा देऊ शकतात.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन