1 / 10रशियाच्या एका विमानात धक्कादायक घटना घडली आहे. या विमानात एक महिला वारंवार आपले कपडे काढण्याचा प्रयत्न करत होती. अखेर केबिन क्रूने तिला दोरी आणि टेपच्या सहाय्याने सीटला बांधून टाकले.2 / 10ही 39 वर्षीय महिला विमानात विचित्र पद्धतीने वागत होती. एवढेच नाही, तर ती केबिन क्रूच्या निर्देशांचे पालनही करत नव्हती.3 / 10डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, विमानाने उड्डाण करताच ही महिला आपल्या सीटवरून उठली आणि लज्जा वाटावी, अशा पद्धतीने विमानात फिरू लागली. 4 / 10व्लादिवोस्तोक शहरातून उड्डाण केल्यानंतर 15 मिनिटांच्या आतच ही महिला आपले कपडे काढण्याचा प्रयत्न करू लागली आणि केबीन क्रूच्या सांगण्याकडेही दूर्लक्ष करू लागली.5 / 10अखेर या महिलेला कपडे काढता येऊ नये आणि इतर प्रवाशांना तिच्या पासून दुखापत होऊ नये, म्हणून केबिन क्रूसह काही लोकांनी या महिलेला नियंत्रणात आणण्यासाठी दोरी, टेप आणि सीट बेल्टच्या सहाय्याने बांधले. 6 / 10यानंतर या महिलेला याच अवस्थेत संपूर्ण प्रवास करावा लागला. यावेळी काही लोक तिच्यावर लक्ष ठेऊन होते.7 / 10हे विमान Novosibirsk's Tolmachevo एअरपोर्टवर लँड झाल्यानंतर, या महिलेला विमानातून उतरवण्यात आले आणि रशियन पोलिसांनी तिला अटक केली. 8 / 10रशियातील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितूनुसार, ट्रांसपोर्ट पोलिसांनी या महिलेला पोलीस ठाण्यात नेले. यानंतर, आपण विमानात बसण्यापूर्वी एका सिंथेटिक ड्रगचा वापर केला होता. यामुळे हा प्रकार घडला, अशी कबुली या महिलेने दिली.9 / 10संबंधित महिलेने किती प्रमाणात ड्रग घेतले आहे, हे तपासण्यासाठी तिला रुग्णालयातही नेण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.10 / 10यापूर्वी 2018 मध्येही एका महिलेने रशियन विमानात असाच धिंगाना घातला होता.