शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russian Military in Arctic: आर्क्टिकमध्ये रशियन सैन्याची तैनाती; पण का? यामागे आहे पुतिन यांचा मोठा 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 9:17 PM

1 / 10
मॉस्को: युक्रेनवर आक्रमण केल्यापासून रशिया आर्क्टिक सर्कलमध्ये सातत्याने आपले सैन्य वाढवत आहे. नॉर्वेमध्ये आलेले ब्रिटनचे संरक्षण मंत्री बेन वॉलेस यांनी दावा केला आहे की, आर्क्टिकमध्ये रशियाच्या लष्करी(Russian Military Buildup in Arctic) हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
2 / 10
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आर्क्टिकमध्ये रशियन सैन्य आणि शस्त्रे तैनात(Russian Military Buildup in Arctic) करून पाश्चात्य देशांवर दबाव वाढवायचा असल्याचा दावाही वॉलेस यांनी केला आहे. नॉर्वे हा आर्क्टिकच्या सीमेला लागून असलेला नाटोचा प्रमुख मित्र देश आहे. या देशात, ब्रिटिश आणि नाटो सैन्याने कोल्ड रिस्पॉन्स 2022 नावाची प्रशिक्षण मोहीम राबवली आहे. गेल्या 30 वर्षांतील नाटोचा हा सर्वात मोठा लष्करी सराव असल्याचे बोलले जात आहे.
3 / 10
अशा स्थितीत आजूबाजूच्या परिसरात रशियाच्या उपस्थितीमुळे (Russian Military Buildup in Arctic) नाटो देश तणावाखाली आहेत. रशियन नौदलाच्या नॉर्दर्न कमांडमध्ये समाविष्ट असलेल्या युद्धनौका आणि पाणबुड्या या भागात गस्त घालत आहेत. आज आर्क्टिक महासागरात सहा देश वसलेले आहेत, यामध्ये रशिया, कॅनडा, युनायटेड स्टेट्स, डेन्मार्क, नॉर्वे आणि आइसलँड यांचा समावेश आहे. अशा स्थितीत आतापर्यंत ओसाड असलेला हा परिसर आता झपाट्याने लोकवस्तीचा होऊ लागला आहे.
4 / 10
ग्लोबल वॉर्मिंगच्या विध्वंसक परिणामांमुळे ध्रुवीय बर्फाचा मोठा भाग वितळला आहे. अशा स्थितीत, जगातील सर्व देश या भागातील ट्रिलियन डॉलर्सची संसाधने मिळवण्यासाठी झपाट्याने घुसखोरी करत आहेत. आर्क्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाचा साठा आहे. अशा परिस्थितीत आर्क्टिकमध्ये प्रत्येक देशाचे स्वारस्य वाढत आहे. अनेक देशांनी आपले हित आणि दाव्यांच्या रक्षणासाठी या प्रदेशात विशेष सैन्य तैनात केले आहे. आर्क्टिकमधील संसाधने मिळवण्यासाठी अनेक देशांची शर्यत सुरू आहे. या शर्यतीत सर्वाधिक वर्चस्व असलेला देश रशिया आहे.
5 / 10
ग्लोबल वॉर्मिंगमुळे ध्रुवीय बर्फ झपाट्याने कमी होत आहे आणि अंदाज वर्तवतात की, आर्क्टिक 2035 पर्यंत बर्फापासून पूर्णपणे मुक्त होईल. उन्हाळ्याच्या महिन्यांत युरोप आणि उत्तर आशियाकडे जाताना आर्क्टिकमधून जहाजे जाणे आता शक्य आहे. हे नवीन मार्ग सुएझ किंवा पनामा कालव्यांद्वारे चालणाऱ्या क्लासिक व्यापार मार्गांपेक्षा लक्षणीयरीत्या लहान आणि किफायतशीर आहेत. आर्क्टिकमधून नवीन व्यापारी मार्ग किती महत्त्वाचे आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला 50 वर्षे मागे जावे लागेल. 19व्या शतकाच्या सुरुवातीला, नेदरलँड्समधील रॉटरडॅम ते चीनमधील शांघायपर्यंत कोणत्याही व्यापारी जहाजाला दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपमधून प्रवास करावा लागत असे.
6 / 10
अशा परिस्थितीत या दोन्ही देशांच्या बंदरांमधील अंतर जवळपास 26 हजार किमी होते. 1869 मध्ये इजिप्तमध्ये सुएझ कालवा उघडल्यानंतर, आशियाई देशांमध्ये पोहोचण्यासाठी आफ्रिकेतील लांब, कठीण प्रवास कमी झाला. यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचून मार्ग किमान 23 टक्क्यांनी कमी झाला. त्याचप्रमाणे आर्क्टिकमधून ईशान्येकडे जाणारा व्यापारी मार्ग खुला झाल्यामुळे प्रवास 24 टक्क्यांनी कमी होणार आहे. यामुळे हा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा जलमार्गही बनणार आहे. मात्र, वर्तमान काळात या सागरी मार्गावरुन वाहतूक फारच कमी असते. भविष्यात बर्फ तोडणाऱ्यांच्या मदतीशिवाय जहाजे या मार्गावरून जाऊ शकतील, अशी अपेक्षा आहे.
7 / 10
सध्या मोठी आणि शक्तिशाली बर्फ तोडणारी जहाजे समुद्रातील बर्फ फोडून मार्ग तयार करतात ज्यातून सामान्य जहाजे प्रवास करतात. अशावेळी हा मार्ग अतिशय संथ आणि खर्चिक होतो. अशा परिस्थितीत वेगाने उष्ण होत असलेला आर्क्टिक महासागर बर्फमुक्त झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढले. परंतु या प्रदेशातील देशांचे स्वतःचे प्रादेशिक दावे आहेत. अशा परिस्थितीत या भागातून जाणाऱ्या सागरी जहाजांना त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून जावे लागेल. यूएस, डेन्मार्क, कॅनडा आणि नॉर्वे आणि आइसलँड यांना आर्क्टिकमधील त्यांच्या उत्तर शेजारी रशियाच्या वाढत्या लष्करी प्रभावाबद्दल खूप चिंता आहे.
8 / 10
युक्रेन युद्धापूर्वीही रशियाचे लक्ष आर्क्टिकवर होते. अशा परिस्थितीत रशिया आर्क्टिकमध्ये आपल्या सैन्याचा झपाट्याने विस्तार आणि आधुनिकीकरण करत आहे. 11 टाइम झोनमध्ये पसरलेला जगातील सर्वात मोठा देश रशिया आर्क्टिकच्या वितळणाऱ्या बर्फामुळे घाबरला आहे. आतापर्यंत समुद्रातील बर्फ गोठल्यामुळे उत्तरेकडून रशियावर हल्ला करणे शक्य नव्हते. आर्क्टिकसह रशियाच्या सीमेची एकूण लांबी 24,000 किमी आहे. अशा परिस्थितीत बर्फ वितळल्याने त्याची सागरी सीमा असुरक्षित होण्याचा धोकाही वाढणार आहे. या भीतीमुळे रशियाने आर्क्टिकमध्ये आपली लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
9 / 10
रशियाने आर्क्टिक प्रदेशात मोठे लष्करी तळ बांधले आहेत. रशियाने उत्तरेकडील सोव्हिएत काळातील 50 हून अधिक लष्करी चौक्या पुन्हा उघडल्या आहेत. दहा रडार स्थानके सुधारित करण्यात आली आहेत, शोध आणि बचाव केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत आणि सीमा चौक्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आर्क्टिकच्या मोठ्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी रशियाने आपली हवाई शक्ती प्रचंड वाढवली आहे.
10 / 10
आर्क्टिकमधील रशियाची सर्वात उत्तरेकडील लष्करी चौकी, अलेक्झांड्रा लँड बेटावरील नागरस्कोये येथील जुना हवाई दलाचा तळ विस्तारित करण्यात आला आहे. आधुनिक मिग-31 लढाऊ विमानांसह जहाजविरोधी आणि विमानविरोधी क्षेपणास्त्रे येथे तैनात करण्यात आली आहेत. रशियाने आपले नौदल सामर्थ्य वाढवण्यासाठी नॉर्दर्न कमांडमध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. रशियन नौदलाने या ताफ्यात 13 नवीन आणि आधुनिक युद्धनौका सामील केल्या आहेत. जगातील सर्वात धोकादायक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र किंजल यापैकी अनेक युद्धनौकांवर तैनात करण्यात आले आहे.
टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिका